Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या वादामध्ये ट्रोल होणारी देवोलीना भट्टाचार्जी भडकली, थेट म्हणाली माझा पती हा

द केरळ स्टोरी हा चित्रपट धमाक कामगिरी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे द केरळ स्टोरी या चित्रपटाने अनेक बाॅलिवूड चित्रपटांचे रेकाॅर्ड हे मोडले आहेत. सलमान खान याच्या चित्रपटाला देखील कमाईमध्ये द केरळ स्टोरी या चित्रपटाने मागे टाकले आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहेय.

'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या वादामध्ये ट्रोल होणारी देवोलीना भट्टाचार्जी भडकली, थेट म्हणाली माझा पती हा
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 3:05 PM

मुंबई : द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यापासून देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) ही प्रचंड चर्चेत आहे. मात्र, देवोलीना भट्टाचार्जी हिचा आणि द केरळ स्टोरी चित्रपटाचा तसा काहीच संबंध नाहीये. म्हणजे या चित्रपटात देवोलीना भट्टाचार्जी हिने कामही केले नाहीये. मात्र, ज्यादिवशी म्हणजेच 5 मेला द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट रिलीज झाल्यापासून देवोलीना भट्टाचार्जी ही तूफान चर्चेत आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यापासून देवोलीना भट्टाचार्जी हिला सतत सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अनेकांनी थेट या वादात देवोलीना भट्टाचार्जी हिच्या नवऱ्याला देखील ओढले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर (Social media) सतत हा वाद वाढताना देखील दिसतोय.

काही दिवसांपूर्वीच देवोलीना भट्टाचार्जी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, मी द केरळ स्टोरी हा चित्रपट बघण्यासाठी माझ्या पतीसोबत गेले होते आणि खास म्हणजे माझ्या पतीला देखील हा चित्रपट खूप जास्त वाढलाय. माझ्या पतीने द केरळ स्टोरी चित्रपटाचे काैतुक केले आहे. देवोलीना भट्टाचार्जी हिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिचा पती हा मुस्लीम असल्याची आठवण करून दिली.

देवोलीना भट्टाचार्जी हिच्या पतीचे नाव शाहनवाज शेख असून काही दिवसांपूर्वीच ती लग्न बंधनात अडकलीये. विशेष म्हणजे बरीच वर्ष हे एकमेकांना डेट करत होते. एका ट्रोल करणाऱ्या व्यक्तीला उत्तर देत देवोलीना भट्टाचार्जी हिने लिहिले की, अरे खान साहब, मी आणि माझ्या पतीने द केरळ स्टोरी चित्रपट अगोदरच बघितला आहे.

विशेष म्हणजे आम्हाला द केरळ स्टोरी हा चित्रपट खूप जास्त आवडलाय. तुम्ही कधी ट्रू हिंदू मुस्लिम हे ऐकले आहे का? चुकीला चुकीचे म्हणण्याची ताकद आणि हिंमत दोन्ही माझ्या पतीमध्ये आहे. हरिद्वारमध्ये मुलींना द केरळ स्टोरी हा चित्रपट फ्री दाखवणार असल्याच्या पोस्टवर एका व्यक्तीने कमेंट करत थेट देवोलीना भट्टाचार्जी हिला बोलवले आहे का? हा प्रश्न विचारला होता.

त्यानंतर या व्यक्तीला जोरदार उत्तर देताना देवोलीना भट्टाचार्जी ही दिसली आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच अनेकजण थेट या वादात देवोलीना भट्टाचार्जी हिला ओढत असून सतत तिच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. देवोलीना भट्टाचार्जी ही देखील ट्रोल करणाऱ्यांना खडेतोड उत्तर देताना दिसत आहे.

करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.