Bobby Deol ला ‘अशा’ अवस्थेत पाहून दुःखी झाल्या होत्या प्रकाश कौर; धर्मेंद्र म्हणाले, ‘तुला असं नाही पाहू शकत’

बॉबी देओल याला मिळत होतं चाहत्यांचं प्रेम पण आईला मात्र पाहावत नव्हती लेकाची अवस्था.. वडील धर्मेंद्र देखील म्हणाले, 'तुला असं नाही पाहू शकत' ... सध्या सर्वत्र बॉबी देओल याची चर्चा...

Bobby Deol ला 'अशा' अवस्थेत पाहून दुःखी झाल्या होत्या प्रकाश कौर; धर्मेंद्र म्हणाले, 'तुला असं नाही पाहू शकत'
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 11:36 AM

मुंबई | 25 जुलै 2023 : अभिनेते धर्मेंद्र कायम त्यांच्या खासगी आयु्ष्यामुळे आणि कुटुंबाबद्दल कायम चर्चेत असतात. धर्मेंद्र यांच्या कुटुंबाद्दल अनेक गोष्टी समोर येत असतात. धर्मेंद्र आणि त्यांची पहिली प्रकाश कौर देखील त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. पण आता धर्मेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता बॉबी देओल याच्याबद्दल चर्चा रंगत आहेत. बॉबी देओल याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण एक काळ असा आला जेव्हा बॉबी देओल याची लोकप्रियता प्रचंड कमी झाली. ज्यामुळे अभिनेत्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण अनेक वर्षांनंतर ‘आश्रम’ या वेब सीरिजच्या माध्यमातून बॉबी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला.

अभिनेत्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरिजला चाहत्यांनी  डोक्यावर घेतलं. ‘आश्रम’ सीरिजमध्ये अभिनेत्याने साकारलेल्या बाबाच्या भूमिकेला चाहत्यांचं प्रेम मिळालं. पण कुटुंबाला मात्र बॉबीने साकारलेली बाबा निराला ही भूमिका आवडली नाही. बाबा निराला ही भूमिका साकारल्यामुळे अभिनेत्याच्या आईला प्रचंड दुःख झालं नाव्हतं.

एका मुलाखतीत अभिनेत्याने आईच्या प्रतिक्रियेबद्दल मोठं वक्तव्य केलं. वेब सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा घरी पोहोचलो, तेव्हा आई म्हणाली, ‘कशी भूमिका साकारली आहेस… कसं करु शकला तू असं काम…’ पुढे अभिनेता म्हणाला, ‘यश मिळाल्यामुळे आई आनंदी होती, पण कोणत्या आईला मुलाला खलनायकाच्या भूमिकेत पहायला आवडेल…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

हे सुद्धा वाचा

मुलाखतीत अभिनेत्याने वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल देखील सांगितलं, ‘वडिलांना भेटलो तेव्हा विचारलं माझं काम कसं वाटलं. ते मला म्हणाले, नाही मी तुला असं पाहू शकत नाही… मला कळतं तू एक स्टार आहेस. एकेकाळी मला देखील वाटत होतं की, वेगळ्या भूमिका साकारू…’ असं धर्मेंद्र मुलगा बॉबी देओल याला म्हणाले होते.

बॉबी देओल याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या‘बरसात’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉबी याच्या करियरच्या सुरुवातीला असंख्या तरुणांमध्ये अभिनेत्याची क्रेझ होती. ‘बादल’, ‘बिच्छू’ आणि ‘एतराज’ यांसारख्या सिनेमांमुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

बरसात या पहिल्याच सिनेमासाठी बॉबी देओल याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्काराने सन्मानिक करण्यात आलं होतं. पण काही वर्षांनंतर अभिनेत्याची लोकप्रियता कमी झाली आणि अभिनेता नैराश्याचा बळी ठरला होता. पण बॉबीची पत्नी पूजा हिने कधीच पतीची साथ सोडली नाही. त्यानंतर ‘आश्रम’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्याची लोकप्रियता पुन्हा वाढली.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.