‘धर्मेंद्र माझ्या आयुष्यातील शेवटचे पुरुष…’, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं मोठं वक्तव्य

धर्मेंद्र यांनी दुसरा संसार थाटल्यानंतर देखील पहिल्या पत्नीने घेतला नाही दुसऱ्या लग्नाचा निर्णय कारण..., प्रकाश कौर म्हणाल्या 'धर्मेंद्र माझ्या आयुष्यातील शेवटचे पुरुष...'

'धर्मेंद्र माझ्या आयुष्यातील शेवटचे पुरुष...', अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 3:33 PM

मुंबई | अभिनेते धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न वयाच्या १९ व्या वर्षी झालं होतं. धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांना चार मुलं आहेत. लग्नानंतर वयाच्या २५ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. धर्मेंद्र यांनी अनेक अभिनेत्रींसोबत एकत्र स्क्रिन शेअर केली. अशात बॉलिवूडमध्ये काम स्वतःची ओळख निर्माण करत असताना धर्मेंद्र यांचा अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर जीव जडला. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाआधी दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. मोठ्या पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांना दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळाला.

धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. महत्त्वाचं म्हणजे, प्रकाश कौर धर्मेंद्र यांना घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हत्या. यामुळे धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच सनी देओल आणि बॉबी देओल यांना देखील मोठा धक्का बसला..

धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केलं असलं तरी प्रकाश कौर यांच्या मनात पतीबद्दल असलेला आदर कमी झाला नाही. प्रकाश कौर म्हणाल्या होत्या, ‘धर्मेंद्र त्यांच्या आयुष्यातील शेवटचे पुरुष आहेत, कारण धर्मेंद्र माझ्या मुलांचे पीता आहेत…’ धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचं आजही घटस्फोट झालेलं नाही. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर एकत्र राहतात. आता धर्मेंद्र दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्यासोबत फार कमी काळ व्यतीत करतात.

हे सुद्धा वाचा

एका मुलाखतीत खुद्द हेमा मालिनी यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होत्या. कधीही आयुष्यात जे हवं ते मिळालं नाही…. असं मोठं वक्तव्य खुद्द हेमा मालिनी यांनी केलं होतं. मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, ‘तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी आहात?’ यावर हेमा म्हणाल्या, ‘मी असं नाही म्हणणार की सर्व काही ठिक आहे. प्रत्येकाला आयुष्यात जे हवं आहे, ते मिळत नाही. व्यक्ती जेव्हा तरुण वयात असतो, तेव्ह परफेक्ट आयुष्याचे स्वप्न पाहत असतो. पण त्याचा काहीही अर्थ नसतो…’

समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास ४० वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.