AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra | ‘सर्व तरुण अभिनेते माझ्या मुलासारखे पण सलमान..’; धर्मेंद्र हे काय बोलून गेले?

'गदर 2'च्या सक्सेस पार्टीतील धर्मेंद्र आणि सलमान खान यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर धर्मेंद्र यांची जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. यामध्ये ते सलमान खानबद्दल बोलताना दिसत आहेत.

Dharmendra | 'सर्व तरुण अभिनेते माझ्या मुलासारखे पण सलमान..'; धर्मेंद्र हे काय बोलून गेले?
Dharmendra and Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2023 | 10:15 AM
Share

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील असे स्टार आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ हा त्यांचा एव्हरग्रीन ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आणि वयाची 85 ओलांडल्यानंतर आजसुद्धा ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्याचप्रमाणे बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानचाही जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच ‘गदर 2’च्या सक्सेस पार्टीमध्ये या दोन मोठ्या कलाकारांना एकाच फ्रेममध्ये पाहिलं गेलं. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. यानिमित्त शनिवारी मुंबईत एका मोठ्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमधील धर्मेंद्र आणि सलमान खान यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

धर्मेंद्र यांची जुनी मुलाखत चर्चेत

सलमान खान आणि धर्मेंद्र यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच धर्मेंद्र यांचा एक जुना व्हिडिओसुद्धा पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागला. हा व्हिडिओ सलमान खानच्या एका कार्यक्रमाचा आहे. ज्यामध्ये धर्मेंद्र आणि सनी देओल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रेडिटवरर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये धर्मेंद्र असं म्हणतायत की नव्या पिढीचे सर्व तरुण कलाकार हे त्यांचा मुलगा सनी देओलसारखे आहेत. मात्र सलमान खानचा त्या सर्वांपेक्षा वेगळा आहे.

“तू सर्वांपेक्षा वेगळा..”

याविषयी धर्मेंद्र पुढे म्हणताता, “तसं तर नव्या पिढीचे सर्व हिरो माझ्या मुलासारखे आहेत. मी सर्वांवर खूप प्रेम करतो पण तू त्या सर्वांपेक्षा खूप वेगळा आहेस. तुला पाहून मला माझा 70-80 च्या दशकातील काळ आठवतो. तुझं आणि माझं आयुष्य एकमेकांशी फार मिळतंजुळतं आहे. या बिचाऱ्याने काहीही केलं तरी तो बदनाम होतो. तो कसाही वागला तरी त्याची चर्चा होती. माझंसुद्धा असंच आहे.”

धर्मेंद्र हे सध्या सनी देओलच्या ‘गदर 2’च्या तुफान यशामुळे खुश आहेत. तर दुसरीकडे सलमान खान लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.