Dhoni Love Life | धोनीच्या दिवंगत गर्लफ्रेंडचं सौंदर्य अप्सरेलाही लाजवेल असं होतं! क्रिकेटरची ‘अधुरी प्रेम कहाणी’

आता साक्षी हिच्यासोबत वैवाहिक आयुष्य जगणाऱ्या धोनीची 'अधुरी प्रेम कहाणी', क्रिकेटरच्या एक्स गर्लफ्रेंडच्या सौंदर्यापुढे अप्सरा देखील फेल...

Dhoni Love Life | धोनीच्या दिवंगत गर्लफ्रेंडचं सौंदर्य अप्सरेलाही लाजवेल असं होतं! क्रिकेटरची 'अधुरी प्रेम कहाणी'
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 3:22 PM

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) आता पत्नी साक्षी धोनी आणि लेक झीवा धोनी यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पत्नी आणि लेकीसोबत क्रिकेटरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. साक्षी हिच्यासोबत लग्न करण्यापू्र्वी धोनी याचं अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं. पण एका सामान्य तरुणीसोबत धोनीच्या प्रेम कहाणीची चर्चा तुफान रंगली. पण दोघांनी लव्हस्टोरी पूर्ण होवू शकली नाही. महेंद्र सिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित (MS Dhoni Life Story) ‘एम एस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमातून क्रिकेटरचं खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य चाहत्यांच्या समोर आलं.

आयुष्यात साक्षी धोनी हिची एन्ट्री होण्यापूर्वी क्रिकेटरच्या आयुष्यात एक तरुणी होती. त्या तरुणीचं नाव होतं प्रियंका झा (Priyanka Jha). धोनी प्रियांकावर प्रचंड प्रेम करत होता. प्रेम लग्नापर्यंत पोहोचण्याआधीच प्रियांका हिचं रस्ते अपघातात निधन झालं. ज्यामुळे धोनी प्रचंड खचला होता. धोनी याच्या आयुष्यातील ही गोष्ट सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांच्या समोर आली.

सिनेमात धोनीच्या दिवंगत गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री दिशा पटानी हिने साकारली होती. अशात खऱ्या आयुष्यात क्रिकेटरची दिवंगत गर्लफ्रेंड प्रचंड सुंदर होती अशी देखील तुफान चर्चा रंगली होती. प्रियंका हिच्या निधनानंतर धोनी क्रिकेटला देखील राम – राम ठोकेल अशी देखील क्रिकेटरच्या जवळच्या लोकांना वाटू लागलं. पण असं काही झालं नाही. धोनीने पुन्हा मोठ्या धैर्याने क्रिकेट विश्वात पाय ठेवला आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

हे सुद्धा वाचा

साक्षी धोनी हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी धोनी यांचं नाव फक्त प्रियंका झा हिच्यासोबत जोडण्यात आलं नाही तर, अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत देखील क्रिकेटरचं नाव जोडण्यात आलं. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत देखील क्रिकेटर नाव जोडण्यात आलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

फक्त दीपिकाच नाही तर लक्ष्मी राय हिच्यासोबत देखील धोनीच्या नावाची चर्चा रंगली होती. क्रिकेटरसोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य देखील केलं होतं. अभिनेत्री म्हणाली होती की, ‘मला माहिती होतं धोनी याच्यासोबत असलेलं माझं नातं एक डाग होता. जो कधीही पुसला जावू शकत नाही. धोनी याच्यासोबत असलेल्या माझ्या नात्याची तुफान चर्चा रंगलेली असते.’ धोनी याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका आणि लक्ष्मी दोघी त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेल्या आहेत.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.