आज कुणीही जिंकलं असलं तरी..; निवडणुकीच्या निकालावर ‘धुरळा’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियांना उधाण आलं आहे. या अनपेक्षित निकालावर कलाविश्वातील अनेकांनी मतं मांडली आहेत. प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन याने लिहिलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आज कुणीही जिंकलं असलं तरी..; निवडणुकीच्या निकालावर 'धुरळा'च्या लेखकाची पोस्ट चर्चेत
NDA and INDIA BlocImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 10:35 AM

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसरी लोकसभा निवडणूकही एकतर्फी होईल, असं बहुतेक एक्झिट पोल्सनी वर्तवलेले निकष खोटे ठरवत भारतीय मतदारांनी मंगळवारी दहा वर्षांनी पहिल्यांदाच संमिश्र कौल दिला. 400 चा आकडा दूरच, परंतु एनडीएला 300 चा आकडाही पार करता आला नाही. सत्तेत रूढ असलेल्या भाजपला 250 जागांच्या पुढे मजल मारता आली नाही. पूर्ण बहुमताच्या जोरावर एनडीएच पुढील सरकार स्थापणार हे निश्चित असले तरी यानिमित्ताने पुन्हा एकदा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आघाडी सरकार येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या या निकालावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धनने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

क्षितिज पटवर्धनची पोस्ट-

आज कुणीही जिंकलं असलं तरी विजय लोकशाहीचा झालाय, अशी पोस्ट क्षितिजने लिहिली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटलंय, ‘आजच्या ठळक भावना’. क्षितिजच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्री प्रिया बापटने ‘100 टक्के खरं’ अशा आशयाची इमोजी पोस्ट केली आहे. तर अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये क्षितिजची ही पोस्ट शेअर केली आहे. त्यावर तिनेसुद्धा ‘100 टक्के खरं’ अशा आशयाची इमोजी पोस्ट केली आहे.

हे सुद्धा वाचा

350 ते 400 जागा किंवा कदाचित त्याच्याही पुढे एनडीए जाईल, तसंच भाजप सलग दुसऱ्यांदा 300 जागांच्या पल्याड मजल मारेल, या समजुतीमध्ये राहिलेल्या भाजपच्या अनेक नेत्यांचा आणि असंख्य कार्यकर्त्यांचा विलक्षण अपेक्षाभंग झाला. या सर्वांत भाजपच्या किंवा एनडीएच्या पीछेहाटीइतकीच लक्षणीय ठरली काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीची अनपेक्षित मुसंडी. काँग्रेस पक्ष दहा वर्षांनी पहिल्यांदाच 100 पार गेला, तर इंडिया आघाडीने पहिल्याच प्रयत्नात 200 पार दमदार मजल मारली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, हरयाणा, कर्नाटक या राज्यांमध्ये इंडिया आघाडीने अनेक धक्कादायक विजय नोंदवले.

उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपची अनपेक्षित पडझड घडवून आणली. कर्नाटकात काँग्रेसने भाजपच्या काही जागांवर विजय मिळवला. तर महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने भाजप आणि फुटीर मित्रपक्षांची वाटचाल रोखून धरली. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात भाजपने बहुतेक जागा राखल्या. तर ओडिशामध्ये लक्षणीय यश मिळवलं. आंध्र प्रदेशमध्येही चंद्राबाबू नायडू यांच्याशी आघाडीचा त्यांना फायदा झाला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.