ऐश्वर्याचं सर्वांसमोर अभिषेकशी भांडण? बाजूला बसलेल्या नव्यावरही चिडली; व्हिडीओ व्हायरल

'सिकंदर खेरसाठी ऑकवर्ड मूमेंट', असं एकाने लिहिलं. तर 'सिकंदर म्हणत असेल की मला इथून जाऊ द्या', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. 'मला या फॅमिलीचं काहीच समजत नाही', असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

ऐश्वर्याचं सर्वांसमोर अभिषेकशी भांडण? बाजूला बसलेल्या नव्यावरही चिडली; व्हिडीओ व्हायरल
Aishwarya RaiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 3:12 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच सोशल मीडियावर सलमान खानसोबतचे ऐश्वर्याचे एडिट केलेले व्हिडीओ व्हायरल होऊ लागले होते. या सर्व चर्चांदरम्यान अखेर अभिषेक बच्चनने अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं होतं. ऐश्वर्या माझी सर्वांत आवडती व्यक्ती असल्याचं त्याने म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा ऐश्वर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ती अभिषेकवर रागावताना दिसत आहे.

रेडिट वेबसाइटवर ऐश्वर्या आणि अभिषेकचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या, अभिषेक, आराध्या, नव्या आणि सिकंदर खेर हे कबड्डीचा सामना पाहताना दिसत आहेत. यादरम्यान असंकाही घडतं की ज्यामुळे ऐश्वर्या अभिषेकवर रागावताना दिसते. ऐश्वर्या अभिषेकला काहीतरी म्हणते आणि नंतर तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. ऐश्वर्याच्या बाजूलाच बसलेली आराध्या ही आई-वडिलांच्या संवादाने नाराज असल्याचं दिसून येत आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात कोणत्या गोष्टीवरून भांडण होतं, हे मात्र स्पष्ट होत नाही. त्यानंतर जेव्हा नव्या ऐश्वर्याशी बोलू लागते, तेव्हा ती तिच्यावरही भडकताना दिसते. नव्याच्या बाजूला बसलेला सिकंदर खेरसुद्धा काही क्षणांसाठी अनकम्फर्टेबर झाल्याचं पहायला मिळतं. इतक्यात आराध्या ऐश्वर्या हळूच मिठी मारते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Aishwarya rolls eyes at Abhishek then snaps at Navya ? ? by u/asamshah in BollyBlindsNGossip

‘सिकंदर खेरसाठी ऑकवर्ड मूमेंट’, असं एकाने लिहिलं. तर ‘सिकंदर म्हणत असेल की मला इथून जाऊ द्या’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘मला या फॅमिलीचं काहीच समजत नाही’, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

अभिषेककडून घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम

ऐश्वर्याने नुकतीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. यावेळी ती मुलगी आराध्यासोबत पोहोचली होती. मात्र या दोघींसोबत अभिषेक कुठेच दिसला नाही. त्याआधीच्या एक-दोन कार्यक्रमात ऐश्वर्या एकटीच दिसल्याने घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं.

NMACC या कार्यक्रमातील ऐश्वर्या आणि आराध्याचा फोटो ट्विटरवर एका युजरने पोस्ट केला. ‘माझी आवडती लोकं’ असं कॅप्शन देत संबंधित युजरने हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता. त्याच फोटोवर अभिषेकने प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझीसुद्धा (आवडती लोकं)’ अशी प्रतिक्रिया देत त्याने हृदयाचा इमोजी पोस्ट केला. त्यामुळे अभिषेकने अप्रत्यक्षपणे घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.