पूनम पांडेच्या मृत्यूचं खरं कारण समोर; सर्वाइकल कॅन्सरने नाही तर ‘या’ कारणामुळे गेला जीव?

पूनमने 2013 मध्ये ‘नशा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यापूर्वी ती मॉडेलिंगमध्ये करिअर करत होती. सोशल मीडिया अकाऊंट्सवरील सेमीन्यूड फोटो आणि व्हिडीओमुळे ती सतत चर्चेत असायची. वयाच्या 32 व्या वर्षी पूनमने अखेरचा श्वास घेतला.

पूनम पांडेच्या मृत्यूचं खरं कारण समोर; सर्वाइकल कॅन्सरने नाही तर 'या' कारणामुळे गेला जीव?
Poonam PandeyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 10:41 AM

मुंबई : 3 फेब्रुवारी 2024 | शुक्रवारी सकाळी अभिनेत्री पूनम पांडेच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. 32 वर्षीय पूनमचं निधन सर्वाइकल कॅन्सरने झाल्याची माहिती तिच्या टीमकडून देण्यात आली. मात्र तिच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी ती पार्टीमध्ये मजामस्ती करताना दिसल्याचाही दावा करण्यात आला. त्यामुळे पूनमचं निधन नेमकं सर्वाइकल कॅन्सरने झालंय का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला. त्यानंतर आता तिच्या मृत्यूबाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. या नव्या रिपोर्टनुसार, पूनमचं निधन सर्वाइकल कॅन्सरने नाही तर ड्रग्ज ओव्हरडोसमुळे झाल्याचं कळतंय. पूनमच्या जवळच्या व्यक्तीने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला.

पूनमच्या जवळच्या व्यक्तीने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की तिचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोसने झाला. मात्र याबद्दल अद्याप कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. त्यामुळे पूनमच्या मृत्यूमागील संशय अद्याप कायमच आहे. काही रिपोर्ट्सनुसार असंही म्हटलं गेलं आहे की पूनमला पुण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच तिने अखेरचा श्वास घेतल्याचं कळतंय. त्यानंतर तिच्या पार्थिवाला उत्तरप्रदेशला नेण्यात आल्याचं म्हटलं गेलंय. मात्र या सर्व वृत्तांबाबत पूनमच्या कुटुंबीयांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

हे सुद्धा वाचा

‘झूम’च्या रिपोर्टनुसार जेव्हा पूनमच्या मृत्यूविषयी तिचा बॉडीगार्ड अमीन खानशी संपर्क केला गेला, तेव्हा तो म्हणाला, “मला सध्या यावर कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण मला खूप मोठा धक्का बसला आहे. पूनमच्या उत्तरप्रदेशमधील घराला टाळं लागलं आहे. तिच्या कोणत्याच कुटुंबीयांनी माझ्याशी संपर्क केला नाही.”

‘पूनमचं गुरुवारी रात्री निधन झालं’, असं तिच्या टीमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिण्यात आली होती. त्यात तिच्या मृत्यूविषयी सांगण्यात आलं होतं. ‘ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. पूनमचं निधन सर्वाइकल (गर्भाशयाच्या) कॅन्सरने झालं आहे’, असं त्यात लिहिलं आहे.

पूनम पांडे ही प्रसिद्ध मॉडेल होती. 2011 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचच्या आधी पूनम सर्वाधिक चर्चेत आली होती. भारताने अंतिम सामना जिंकला तर मी स्ट्रिपिंग करेन, असं तिने जाहीर केलं होतं. तिच्या या व्हिडीओची त्यावेळी सर्वाधिक चर्चा झाली होती. पूनमच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोमध्ये झळकली होती.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...