बोनी कपूर नव्हे तर श्रीदेवी यांनी ‘या’ खास व्यक्तीशी लग्न करावं अशी आईची होती इच्छा

'या' दिग्गज अभिनेत्याकडे श्रीदेवी यांच्या आईने केला होता लग्नाचा उल्लेख

बोनी कपूर नव्हे तर श्रीदेवी यांनी 'या' खास व्यक्तीशी लग्न करावं अशी आईची होती इच्छा
SrideviImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 1:25 PM

मुंबई- ‘सदमा’ या चित्रपटातील कमल हासन आणि श्रीदेवी यांच्या अभिनयकौशल्याचं कौतुक करावं तेवढं कमी. या चित्रपटाला आणि त्यातील दोघांच्या कामगिरीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. कमल हासन आणि श्रीदेवी यांची ऑनस्क्रीन जोडीसुद्धा अनेकांना खूप आवडली होती. या जोडीला मिळत असलेलं प्रेम पाहून खऱ्या आयुष्यात त्यांनी लग्नबंधनाच अडकावं, अशी श्रीदेवी यांच्या आईची इच्छा होती.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर कमल हासन यांनी ‘द 28 अवतार्स ऑफ श्रीदेवी’ या नावाने त्यांच्या खास आठवणी लिहिल्या होत्या. श्रीदेवी यांच्या प्रार्थनासभेत त्यांनी ते वाचून दाखवलं होतं. यामध्येच लग्नाच्या प्रसंगाचाही उल्लेख कमल हासन यांनी केला होता.

“श्रीदेवी आणि माझ्यात इतकी चांगली मैत्री झाली होती की त्यांच्या आईने मला तिच्याशी लग्न करण्यास सांगितलं होतं. मात्र ज्या व्यक्तीला मी माझ्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणेच मानतो, तिच्याशी मी लग्न करू शकत नाही असं म्हणून मी ती गोष्ट टाळायचो,” असं कमल हासन म्हणाले.

हे सुद्धा वाचा

श्रीदेवी यांच्या मनात कमल हासन यांच्यासाठी खूप आदर होता. म्हणूनच त्या नेहमी त्यांना ‘सर’ म्हणून हाक मारायच्या. आमचं नातं, आमची मैत्री खूप पवित्र होती, असं कमल हासन म्हणाले होते.

‘मुंड्रू मुडिचू’ या तमिळ चित्रपटाच्या सेटवर श्रीदेवी आणि कमल हासन यांची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी श्रीदेवी फक्त 13 वर्षांच्या होत्या. 1976 मध्ये जेव्हा त्या इंडस्ट्रीतील करिअरची सुरुवात करत होत्या, तेव्हाची ही घटना होती.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.