Gadar 2 | ‘अखेर राहावलंच नाही’; सनी देओलचा ‘गदर 2’ पाहिल्यानंतर डिंपल कपाडियाने पापाराझींना केलं दुर्लक्ष

डिंपल कपाडियाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 'अखेर राहावलंच नाही', असं एकाने म्हटलं. तर 'एक्स बॉयफ्रेंडचा चित्रपट पाहण्यासाठी फार उशीर केला' असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. 'या दोघांचं खूप जुनं नातं आहे' असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

Gadar 2 | 'अखेर राहावलंच नाही'; सनी देओलचा 'गदर 2' पाहिल्यानंतर डिंपल कपाडियाने पापाराझींना केलं दुर्लक्ष
Dimple Kapadia and Sunny DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 3:30 PM

मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात कमाईचा 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल पाहण्यासाठी अजूनही प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. बॉलिवूडच्या बऱ्याच सेलिब्रिटींनीही हा चित्रपट पाहिला आणि त्याचं कौतुक केलं. अशातच अभिनेत्री डिंपल कपाडियासुद्धा ‘गदर 2’ पाहण्यासाठी मुंबईच्या एका थिएटरमध्ये पोहोचली.

मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमधून बाहेर पडताना पापाराझींनी डिंपल कपाडियाचा व्हिडीओ शूट केला. मात्र यावेळी तिने पापाराझी आणि फोटोग्राफर्सकडे साफ दुर्लक्ष केलं. थिएटरमधून बाहेर पडताच ती वेगाने जाऊन कारमध्ये बसली. अभिनेता अक्षय कुमारची सासू आणि ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडियाने सनी देओलसोबत काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. नरसिम्हा, आग का गोला, अर्जुन, मंजिल मंजिल आणि गुनाह यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. 80 च्या दशकात या दोघांच्या अफेअरच्याही जोरदार चर्चा होत्या. सनी देओलची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अमृता सिंहने या नात्याचा खुलासा केला होता.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

डिंपल कपाडियाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ‘अखेर राहावलंच नाही’, असं एकाने म्हटलं. तर ‘एक्स बॉयफ्रेंडचा चित्रपट पाहण्यासाठी फार उशीर केला’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘या दोघांचं खूप जुनं नातं आहे’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

सनी देओल आणि डिंपल यांनी काही चित्रपटात बोल्ड सीन्ससुद्धा दिले होते. राजेश खन्ना यांना घटस्फोट दिल्यानंतर डिंपल आणि सनी देओल यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. जेव्हा डिंपलची बहीण सिंपल कपाडियाचं निधन झालं, तेव्हासुद्धा सनी देओल तिला सावरताना दिसला. जवळपास 11 वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केल्याचं म्हटलं जातं.

‘गदर 2’ या चित्रपटाने आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाला मागे टाकलं आहे. आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात 388.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दुसऱ्या वीकेंडची कमाई

शुक्रवार- 20.50 कोटी रुपये शनिवार- 31.07 कोटी रुपये रविवार- 38.90 कोटी रुपये सोमवार- 13.50 कोटी रुपये एकूण- 388.60 कोटी रुपये

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.