सेक्स रॅकेटचा भांडाफोड, प्रसिद्ध सेलिब्रिटीला अटक, पोलिसांकडून 2 मॉडेल्सची सुटका

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर... हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड, बक्कळ पैशांचं आमिष देऊन मॉडेल्सकडून...

सेक्स रॅकेटचा भांडाफोड, प्रसिद्ध सेलिब्रिटीला अटक, पोलिसांकडून 2 मॉडेल्सची सुटका
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 12:37 PM

मुंबई : झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तल हिला अटक केली आहे. सेक्स रॅकेट चालवल्याचा आरोप करत आरतीला अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांनी तिला रंगेहात पकडलं आहे. शिवाय आरतीच्या ताब्यातून दोन मॉडेल्सची सुटका देखील करण्यात आली आहे. आरतीला रंगेहात पकडण्यासाठी पोलिसांनी एक सापळा रचला होता. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने दोन बनावट ग्राहकांची रवानगी करून दोन मॉडेल्सची सुटका केली आहे. दोन मॉडेल्समधील एका मॉडेलला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे. तर दुसऱ्या मॉडेलची पोलीस चौकशी करत आहेत.

मुंबई पोलिसांनी ही पूर्ण घटना स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने रेकॉर्ड केली असून कास्टींग दिग्दर्शक आरती मित्तल हिच्या विरोधात एफआरआय देखील नोंदवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांची सोशल सर्विस ब्रान्च याप्रकरणी चौकशी करत आहे. पुरावा म्हणून घटनेचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड करण्यात आला आहे.

सेक्स रॅकेट प्रकरणातील आरोपी आरती मित्तल सिनेमांसाठी कास्टिंग दिग्दर्शकाचं काम करते. आरती ओशिवारा येथील आराधना अपार्टमेंटमध्ये राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मॉडेल्स आरतीकडे वेग-वेगळ्या प्रेजेक्टसाठी यायच्या, अशा मॉडेल्सना ती जाळ्यात अडकवायची. आरती मॉडेल्सना बक्कळ पैसे द्यायची, पण त्यांच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय करुन घ्यायची. आरती हे वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांना मिळाली होती.

हे सुद्धा वाचा

माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि मित्रासाठी आरतीकडून दोन मुलींचे फोटो मागावले. यासाठी आरतीने तब्बल ६० हजार रुपयांची मागणी केली आणि पोलिस निरीक्षक मनोज सुतार यांच्या फोनवर दोन मुलींचे फोटो पाठवले. शिवाय मॉडेल्स जुहू किंवा गोरेगाव येथील हॉटेलमध्ये येतील असं देखील सांगितलं.

पोलिस निरीक्षक मनोज सुतार याने गोरेगाव याठिकाणी हॉटेलमध्ये दोन खोल्या बूक केल्या. जेव्हा आरती मॉडेल्ससोबत हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा त्यांना कंडोम देखील देण्यात आले. हे देखील स्पाय कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. शाखेने हॉटेलवर छापा टाकून आरोपीला रंगेहात पकडले.

यानंतर त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली आणि आरती मित्तल हिच्याविरोधात एफआयआर दाखल केला. चौकशीदरम्यान मॉडेलने खुलासा केला की, आरतीने तिला १५ हजार रुपये देण्याचे वचन दिलं होतं. सध्या याप्रकरणी सर्वत्र खळबळ माजली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.