Aamir Raza Husain | प्रेक्षकांना लार्जर दॅन लाइफचा अनुभव देणारे प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक आमिर रजा हुसैन यांचं निधन

'RRR', 'बाहुबली' आणि 'आदिपुरुष' यांसारख्या मोठ्या बजेटच्या आणि 'लार्जर दॅन लाइफ' चित्रपटांच्या खूप आधी आमिर यांनी 'द फिफ्टी डेय वॉर' या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मेगा थिएटर प्रॉडक्शनचा अनुभव दिला होता.

Aamir Raza Husain | प्रेक्षकांना लार्जर दॅन लाइफचा अनुभव देणारे प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक आमिर रजा हुसैन यांचं निधन
Aamir Raza HusainImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 10:54 AM

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि आर्टिस्ट आमिर रजा हुसैन यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 66 वर्षांचे होते. आमिर यांच्या पश्चात पत्नी विराट तलवार आणि दोन मुलं असा परिवार आहे. आमिर यांचा जन्म 6 जानेवारी 1957 मध्ये झाला होता. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आईनेच त्यांना लहानाचं मोठं केलं. अजमेरमधल्या शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये त्यांनी इतिहास विषयातून पदवीचं शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी जॉय मायकल, बेरी जॉन आणि मार्क्स यांसारख्या दिग्गजांच्या दिग्दर्शनाखाली नाटकात अभिनय केलं होतं.

‘RRR’, ‘बाहुबली’ आणि ‘आदिपुरुष’ यांसारख्या मोठ्या बजेटच्या आणि ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रपटांच्या खूप आधी आमिर यांनी ‘द फिफ्टी डेय वॉर’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मेगा थिएटर प्रॉडक्शनचा अनुभव दिला होता. 2000 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या नाटकातून कारगिल युद्ध अशा पद्धतीने दाखवण्यात आलं होतं, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. 140 परफॉर्मर्स आणि 70 लाखांच्या बजेटमध्ये भव्य हेलिकॉप्टर, दोन मिग विमानांचा भव्य देखावा करण्यात आला होता.

‘द लेजंड ऑफ राम’ आणि ‘जीसस क्राइस्ट- सुपरस्टार’ यांसारख्या नाटकांतून त्यांनी प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव दिला. ते शेवटचे ‘खुबसूरत’ या चित्रपटात झळकले होते. 2014 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये सोनम कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान मुख्य भूमिकेत होते.

हे सुद्धा वाचा

कॉलेजमध्ये असतानाच आमिर रजा हुसैन यांची विराट तलवार यांच्याशी भेट झाली होती. त्यांची पत्नी क्रिएटिव्ह पार्टनरसुद्धा होती. 1987 मध्ये ‘डेंजरस लिएझॉन’ या नाटकादरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.