AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar: ‘वेडात मराठे..’च्या शूटिंगला सुरुवात; छत्रपती शिवाजी महाराजांपुढे वंदन करत अक्षय म्हणाला..

महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाची शूटिंग सुरू; अक्षय कुमारने पोस्ट केला फोटो

Akshay Kumar: 'वेडात मराठे..'च्या शूटिंगला सुरुवात; छत्रपती शिवाजी महाराजांपुढे वंदन करत अक्षय म्हणाला..
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 06, 2022 | 10:50 AM
Share

मुंबई: अभिनेता अक्षय कुमारने महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या बहुचर्चित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवशी शूटिंगला जाण्याआधी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांपुढे हात जोडले. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अक्षयने शूटिंगला सुरुवात करत असल्याची माहिती दिली. या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय.

अक्षय कुमारची पोस्ट-

‘आज मराठी चित्रपट वेडात मराठे वीर दौडले सात याच्या शूटिंगला सुरुवात करतोय. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणं म्हणजे माझं सौभाग्य आहे. मी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि आई जिजाऊ यांच्या आशीर्वादाने माझे पूर्ण प्रयत्न करेन. माझ्यावर आशीर्वाद राहू द्या’, अशी पोस्ट अक्षयने लिहिली. त्याचसोबत शिवरायांना वंदन करतानाचा फोटो पोस्ट केला.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दीक जोशी, सत्या, अक्षय, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्याही भूमिका आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट 2023 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर त्यावरून खूप मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात चुकीचे संदर्भ असून चुकीची नावं, तसंच मावळ्यांची वेशभूषादेखील चुकीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा या चित्रपटाला विरोध दर्शवला होता.

राज ठाकरेंमुळे अक्षयला मिळाली भूमिका

“मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही राज ठाकरेंमुळे मिळाली. त्यांनी मला आश्वासन दिलं की तू ही भूमिका साकारू शकतोस. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेसाठी मी माझं सर्वस्व अर्पण करेन”, असं वक्तव्य अक्षयने चित्रपटाच्या घोषणेदरम्यान केलं होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.