AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फार्महाऊसमध्ये तब्येत बिघडली, कारमध्येच घेतला Satish Kaushik यांनी अखेरचा श्वास

कोरोनानंतर 'या' आजारामुळे अनेकांनी गमावले प्राण..., सतीश कौशिक यांच्या निधनाचं कारण खुद्द डॉक्टरांनी सांगितलं... डॉक्टरांनी सांगितलेलं कारण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं...

फार्महाऊसमध्ये तब्येत बिघडली, कारमध्येच घेतला  Satish Kaushik यांनी अखेरचा श्वास
| Updated on: Mar 09, 2023 | 11:08 AM
Share

Satish Kaushik : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांना वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सतीश यांना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान सतीश कौशिक यांचं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून सतीश कौशिक यांचं वजन सतत वाढत होतं. सतत वाढत्या वजनामुळे सतीश कौशिक त्रस्त होते. वाढतं वजन हृदयविकारासाठी मोठं कारण आसल्याचं खुद्द डॉक्टरांनी सांगितलं आहे.

ज्या लोकांचं वजन जास्त आहे, त्यांना सामान्य लोकांच्या तुलनेत हृदयविकाराची अधिक भीती असते. अशात सतीश कौशिक यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालं आहे की, वाढत्या वजनामुळे? की अन्य कोणत्या आजारामुळे सतीश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला? या प्रश्नाचं उत्तर खुद्द हृदयरोग तज्ज्ञांनी दिलं आहे.

वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दीपक सुमन म्हणाले, ‘वाढतं वजन आणि हृदयविकाराचं फार जवळचं नातं आहे. तुमचं वजन वाढत असेल, हृदयविकाराची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या वजनामुळे डायबिटीज आणि हायपरटेन्शन यांसारख्या समस्या अधिक वाढतात. ज्याचा परिणाम हृदयाला होतो. वाढत्या वयात हे आजार डोकं वर काढतात.’

‘बहुतेक प्रकरणांमध्ये, लठ्ठपणा वाढल्यामुळे, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी देखील शरीरात वाढू लागते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. ज्या लोकांची पोटाची चरबी अधिक असते त्यांना इतर लोकांच्या तुलनेत हृदयविकारांचा धोका तीन पटीने अधिक असतो. असं देखील डॉ. सुमन म्हणाले.

ज्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स ३० पेक्षा जास्त आहे, त्यांना हृदयविकारांचा धोका इतर लोकांपेक्षा अनेक पटीने जास्त असतो. लठ्ठपणामुळे होणारे जीवनशैलीचे आजार वृद्धापकाळात हृदयविकारांसाठी कारणीभूत ठरु शकतात, हे देखील अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झालं असल्याची माहिती डॉ. दीपक सुमन यांनी दिली आहे.

राजीव गांधी रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गेल्या काही वर्षांपासून हृदयविकारांचा धोका वाढताना दिसत आहे. शिवाय धकाधकीचं आयुष्य आणि आहारात होत असलेले बदल हृदयविकारांसाठी मोठं कारण आहे. कोरोनानंकर हार्ट अटॅकच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.’

‘कोरोना व्हायरसमुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लड क्लॉट होत आहेत. त्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा करण्यात अडचण येत असून लोकांना हृदयविकारांच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. यामुळे लोक कमी वयात लोक प्राण गमावत आहेत.’ असं देखील डॉक्टर अजित जैन म्हणाले.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.