डॉक्टरांच्या सल्ल्याने आईने अबॉर्शन केलं असतं तर, ‘या’ चिमुकलीने पाहिलं नसतं जग; आज आहे टॉप अभिनेत्री

'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईला डॉक्टरांनी दिला होता अबॉर्शनचा सल्ला; पण आईने चिमुकलीचं केलं जगात स्वागत... फोटोत दिसणारी चिमुकली आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री

डॉक्टरांच्या सल्ल्याने आईने अबॉर्शन केलं असतं तर, 'या' चिमुकलीने पाहिलं नसतं जग; आज आहे टॉप अभिनेत्री
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 12:33 PM

मुंबई : 11 सप्टेंबर 2023 | सध्या सोशल मीडियावर एका फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये एक चिमुकली दिसत आहे. फोटोमध्ये दिसणारी चिमुकली आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीच्या जन्माआधी डॉक्टरांनी तिच्या आईला अबॉर्शन करण्याचा सल्ला दिला. पण मोठा धोका असून देखील फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीच्या आईने लेकीचं जगात स्वागत केलं. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री शिल्पा शेट्टी  (Shilpa Shetty ) आहे. सध्या सर्वत्र शिल्पा हिच्या लहानपणीची चर्चा रंगली आहे.

शिल्पा म्हणाली, ‘माझ्या आईने मला सांगितलं की जेव्हा ती गरोदर होती, तेव्हा तिला वाटलं की ती मला गमावणार आहे. कारण तिच्या गर्भधारणेत अनेक अडचणी होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी आईला अबॉर्शन करण्याचा देखील सल्ला दिला होता. सतत रक्तस्त्राव होत असल्याने तिचा गर्भपात होईल असे डॉक्टरांना वाटत होतं.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘अनेक कठीण परिस्थितीत आईने मला जन्म दिला. पण जन्माला आल्यानंतर मला श्वास घेता येत नव्हतं. आईला कायम वाटायचं मी महत्त्वाच्या उद्देशाने जगात आली आहे. सिनेमे माझ्या जीवनातील महत्त्वाचं घटक आहे. त्यामुळे मी सोशल मीडियावर कामय पोस्ट शेअर करत असते, प्रत्येकाच्या आयु्ष्यात कठीण प्रसंग येतात आणि ती वेळ सोपी नसते…’ सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

शिल्पा शेट्टी हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘सुखी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री एका पंजाबी गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाची कथा पती – पत्नीच्या भोवती फिरताना दिसत आहे. सुखी तिच्या पतीच्या पाठीमागे तिच्या शाळेच्या रीयूनियनसाठी दिल्लीला जाते.

दिल्लीत गेल्यानंतर अभिनेत्रीला तिला एकदा मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव होते. सिनेमात शिल्पा हिच्यासोबत अमित साध, कुशा कपिला, पवलीन गुजराल, दिलनाज ईराणी, चैतन्य चौधरी आणि ज्योती कपूर महत्त्वाच्या भूमिकत दिसणार आहे. सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरु आहे.

शिल्पा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.