‘दृश्यम 2’ अभिनेत्री एअरपोर्टवर नवऱ्यासोबत भलतीच झाली रोमँटिक; नेटकरी म्हणाले..

'दृश्यम 2' अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी; एअरपोर्टवर सर्वांसमोर..

'दृश्यम 2' अभिनेत्री एअरपोर्टवर नवऱ्यासोबत भलतीच झाली रोमँटिक; नेटकरी म्हणाले..
Shriya SaranImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 9:38 AM

मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये विशेष छाप सोडणारी अभिनेत्री श्रिया सरन तिच्या बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. श्रियाचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. लग्नानंतर परदेशात स्थायिक झालेली श्रिया या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त पतीसोबत भारतात आली होती. पतीसोबत पुन्हा परदेशी जाताना तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती एअरपोर्टवर सर्वांसमोर पतीबद्दलचं प्रेम जाहीर करताना दिसून येतेय.

श्रियाने 2018 मध्ये रशियन टेनिसपटू आंद्रे कोशिव्ह याच्याशी लग्न केलं. त्याच्यासोबतचे बरेच फोटो आणि व्हिडीओ श्रिया तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करताना दिसते. सोशल मीडियावर नुकत्याच व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये श्रिया तिच्या पतीसोबत अत्यंत खूश दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य तिच्या आनंदाला जगजाहीर करत आहे.

हे सुद्धा वाचा

एअरपोर्टवर पापाराझींसाठी पोझ देताना श्रिया पतीसोबत लिपलॉक करताना दिसली. सार्वजनिकरित्या लिपलॉक केल्याचा तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी श्रियावर टीकासुद्धा केली आहे.

‘जगाला माहीत आहे की हा तुझा पती आहे, मग असं करणं गरजेचं होतं का’, असा सवाल एका युजरने केला. तर ‘कॅमेरा पाहून उगाच दिखावेपणा करतेय’ असं दुसऱ्याने म्हटलं.

पहा व्हिडीओ-

श्रिया आणि आंद्रे यांना एक मुलगी आहे. 2020 मध्ये तिने मुलीला जन्म दिला. 2018 मध्ये तिने राजस्थानमध्ये आंद्रेशी लग्न केलं. या दोघांची पहिली भेट मालदीवमध्ये झाली होती. लग्नानंतर ती पतीसोबत बार्सिलोनामध्ये राहतेय. 2020 मध्ये तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता.

श्रियाचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. यामध्ये तिने अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटातही ती अजयच्या पत्नीच्या भूमिकेत होती.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.