Mumbai: निवेदिता सराफ यांच्यासमोर ड्राइव्हरला बेदम मारहाण

अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांच्या ड्राइव्हरला किरकोळ वादातून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मुंबईतल्या (Mumbai) जुहू इथल्या जेव्हीपीडी जंक्शनजवळ ही घटना घडली. रविवारी रात्री त्या विलेपार्ले (VileParle) इथून घरी परतत होत्या.

Mumbai: निवेदिता सराफ यांच्यासमोर ड्राइव्हरला बेदम मारहाण
Nivedita SarafImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 9:20 AM

अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांच्या ड्राइव्हरला किरकोळ वादातून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मुंबईतल्या (Mumbai) जुहू इथल्या जेव्हीपीडी जंक्शनजवळ ही घटना घडली. रविवारी रात्री त्या विलेपार्ले (VileParle) इथून घरी परतत होत्या. रात्री 10.30च्या सुमारास जेव्हीपीडी सिग्नलजवळ एका कारने निवेदिता सराफ यांच्या गाडीला मागून धडक दिली. यावेळी सराफ यांचा ड्राइव्हर अजय ठाकूर (38) हा गाडीचं काही नुकसान झालं का, हे पाहण्यासाठी खाली उतरला असता गाडी ठोकणाऱ्याने अजयला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत त्याने मारहाणही केल्याचं निवेदिता यांनी तक्रारीत म्हटलं.

“मारहाण करणाऱ्याने मलाही गाडीची काच खाली कर, असं म्हणत धमकावलं. अखेर अजयने पोलिसांना फोन करतो असं सांगताच त्याने तिथून पळ काढला. पळ काढत असतानाही त्याने एका बेस्ट चालकालाही शिवीगाळ केली,” असं त्यांनी सांगितलं. या घटनेची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर जुहू पोलिसांनी आरोपीच्या नाशिक नोंदणीकृत गाडीचा तपशील मागवला आहे. त्यासोबत सीसीटीव्ही फुटेजचाही तपास ते करत आहेत.

पोलिसांनी मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवला असून या घटनेप्रकरणी ते अधिक तपास करत आहेत. MH-15-BD-9945 या नंबरच्या गाडीची नाशिकमध्ये नोंदणी झाली असून आम्ही मालकाचा तपास करत आहोत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधाकर शिरसाट यांनी ‘टाइम्स ऑफिस इंडिया’शी बोलताना दिली.

हेही वाचा:

The Kashmir Filesचा मोठा विजय; विवेक अग्निहोत्रींनी ट्विट करत दिली माहिती

RRR मधून फक्त आलियाच नव्हे तर मकरंद देशपांडे यांचेही सीन्स केले कट; राजामौलींच्या कामाबद्दल म्हणाले..

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.