विजय माल्याचा ‘किंगफिशर’ खरेदी करणारा, राज कुंद्राचा पूर्व बिझनेस पार्टनर अभिनेता सचिन जोशी ईडीच्या रडारवर, 410 कोटींची संपत्ती जप्त
मुंबई: बॉलीवुड अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशी (sachin joshi) सतत कोणत्या ना कोणत्या प्रकरणात नेहमी चर्चेत असतो. आता सचिन जोशीची 410 कोटींची संपत्ती ईडीने (ed) ताब्यात घेतली आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी त्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात 330 कोटींचा फ्लॅट जप्त केला आहे शिवाय पुण्यातली ८० कोटींची जमीनही ईडीने जप्त केली आहे. […]
मुंबई: बॉलीवुड अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशी (sachin joshi) सतत कोणत्या ना कोणत्या प्रकरणात नेहमी चर्चेत असतो. आता सचिन जोशीची 410 कोटींची संपत्ती ईडीने (ed) ताब्यात घेतली आहे. मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणी त्याची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात 330 कोटींचा फ्लॅट जप्त केला आहे शिवाय पुण्यातली ८० कोटींची जमीनही ईडीने जप्त केली आहे. ही सगळी संपत्ती ओंकार ग्रुप (the omkar group) आणि सचिन जोशी यांच्या मालकीची आहे.
ED has attached assets worth Rs. 410 Crore of Omkar Group and Sachin Joshi under PMLA, 2002 in a loan fraud case.
— ED (@dir_ed) January 15, 2022
नेमकं हे प्रकरण काय आहे?
2020 ला औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये मनी लाँड्रिंगशी संबंधित तक्रार दाखल करण्यात आली होती. याच्याआधारे ईडीने ही कारवाई केली आहे. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यातही ईडीने या प्रकरणाची चौकशी केली होती. यावेळी मेसर्स ओआरडीपीएलचे प्रबंध निर्देशक बाबुलाल वर्मा, मेसर्स ओआरडीपीएलचे अध्यक्ष कमल किशोर आणि सचिन जोशीला अटक केली. 2021 मध्ये या प्रकरणी चार्जशीट देखील दाखल करण्यात आली होती.
ईडीचं स्पष्टीकरण
ईडीनं या सगळ्या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे. 410 कोटींची जी संपत्ती जप्त केली त्यातली 330 कोटींची संपत्ती ही ओंकार ग्रुपची आहे. तर 80 कोटींची संपत्ती सचिन जोशी आणि विकिंग ग्रुपची आहे, असं ईडीनं कारवाईनंतर म्हटलं आहे.
सचिन जोशी कोण आहे?
सचिन जोशी याने 2017 ला विजय माल्याचा ‘किंगफिशर’ नावाचा बंगला खरेदी केला. सचिन JMJ ग्रुपचा प्रमोटर आहे. पान मसाला, परफ्युम, द्रव पदार्थ आणि मद्याचा व्यापार सचिन करतो. प्लेबॉय (रेस्टॉरंट आणि क्लब चैन) च्या भारतीय फ्रँचाईजीचा तो मालकही आहे.
राज कुंद्राशी सचिन जोशीचा काय संबंध
सचिन जोशी हा बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा पूर्व बिझनेस पार्टनर आहे. सचिनने सतयुग गोल्ड केस प्रकरणी राज कुंद्राच्या विरोधात केस जिंकली होती. सचिनने काही साऊथ इंडियन चित्रपटात काम केलं आहे. मुंबई मिरर, जॅकपॉट, विरप्पन या सारख्या चित्रपटातही त्याने काम केलं आहे.
संबंधित बातम्या