AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Top 5 News | ‘हम आपके हैं कौन’एव्हरग्रीन चित्रपटाची 27 वर्षे ते रितेश देशमुखने सांगितलं बायकोचं खरं नाव, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी

जर तुम्ही गुरुवार म्हणजेच 5 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

Top 5 News | ‘हम आपके हैं कौन’एव्हरग्रीन चित्रपटाची 27 वर्षे ते रितेश देशमुखने सांगितलं बायकोचं खरं नाव, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी
Top 5 News
| Edited By: | Updated on: Aug 06, 2021 | 10:36 AM
Share

मुंबई : दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही कालचा दिवस (5 ऑगस्ट) खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही गुरुवार म्हणजेच 5 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाही, रितेश देशमुखने खरं नाव सांगितलं!

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीची मोहक आणि बबली अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुखसाठी (Genelia D’Souza) 5 ऑगस्ट खूप खास आहे. कारण या दिवशी जिनिलियाचा वाढदिवस आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखसोबत जिनिलिया डिसूझाचा विवाह झाला आहे. दोघं बॉलिवूडचे क्युट कपल म्हणून ओळखले जातात.

आता जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखनं खास गोष्ट चाहत्यांना सांंगितली आहे. गेले अनेक वर्षे आपण ‘जेनेलिया’ या नावानं रितेशच्या बायकोला ओळखतो मात्र आता रितेशनं एक ट्विट करत ‘माझ्या बायकोचे नाव ‘जिनिलिया’ आहे … जेनेलिया नाही.’ असं सांगितलं आहे. त्यानं आज म्हणजेच जिनिलियाच्या वाढदिवशी हे ट्विट केलं आहे.

एव्हरग्रीन चित्रपटाची 27 वर्षे, जाणून घ्या ‘हम आपके हैं कौन’च्या खास गोष्टी

सूरज बडजात्यांचा (Suraj Badjatya) सुपरहीट चित्रपट ‘हम आप के हैं कौन’ (Hum Aapke Hai Kaun) ला रिलीज होऊन आज 27 वर्षे पूर्ण होत आहेत. 27 वर्षांनंतरही या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला होता. यासोबतच अनुपम खेर (Anupam Kher), आलोक नाथ(Aloknath), मोहनिश बहल (Mohnish Bahl) आणि रीमा लागू(Rima Lagu) सारखे दिग्गज कलाकारही या सिनेमात पाहायला मिळाले होते.

इतकी बदलली की ओळखू देखील येईना!

सगळेच चाहते अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 19 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलरही मंगळवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत वाणी कपूर (Vani Kapoor), हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि लारा दत्ता (Lara Dutta) यांच्याही चित्रपटात दमदार भूमिका आहेत. ट्रेलर समोर आल्यानंतर चित्रपटाची बरीच चर्चा रंगली आहे. विशेषत: लारा दत्ताचे खूप कौतुक होत आहे. चित्रपटात तिचा लूक आणि मेकओव्हर थक्क करणारा आहे. या लूकमध्ये लारा दत्ताला एका दृष्टीक्षेपात ओळखणे कठीण आहे.

शाहरुख आमिरला म्हणाला काजोल चांगली अभिनेत्री नाही!

शाहरुख त्याच्या एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, तो आणि काजोल बाजीगर या चित्रपटात एकत्र काम करत होते. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान आमीर खानने शाहरुखकडे काजोलला आपल्या नवीन चित्रपटात कास्ट करण्याविषयी विचारणा केली होती. तेव्हा शाहरुखने त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि म्हणाला की, काजोलला चित्रपटात घेऊ नकोस, ती चांगली अभिनेत्री नाही. ती कामावर लक्ष देत नाही. तू तिच्यासोबत काम करू शकणार नाहीस.

शाहरुख खान ते अक्षय कुमारपर्यंत, बॉलिवूडकरांनी भारतीय हॉकी संघावर केला शुभेच्छांचा वर्षाव!

भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 असा विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने हॉकीमधला 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. तब्बल 41 वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक जिंकलं आहे. भारतीय हॉकी संघाच्या विजयानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाली आहे. बॉलिवूड सेलेब्स सोशल मीडियावर भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करत आहेत.

हेही वाचा :

Rekha : अभिनेत्री रेखा यांच्या अभूतपूर्व सौंदर्यानं आणि खळाळत्या उत्साहानं ‘गुम है किसी के प्यार में’च्या नव्या प्रोमोला लावले चार चाँद!

पहिलीच फिल्म हिट ठरल्यानंतरही करिअर फ्लॉप झाले! पाहा ‘टार्झन’ फेम वत्सल शेठ आता काय करतो?

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.