Esha Deol Divorce : कोणत्या मुलीने मोडला ईशाचा संसार, कुठे राहते ‘ती’, पतीच्या अफेअरमुळे संपलं नातं?
Esha Deol Divorce : अभिनेते धर्मेंद्र यांच्या जावयाचे विवाहबाह्य संबंध, जिच्यामुळे मोडला ईशा देओल हिचा संसार, 'ती' राहते तरी कुठे? मोठी अपडेट समोर... ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी 11 वर्षांच्या नात्याचा वाईट अंत...
Esha Deol Divorce : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल (Isha Deol) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ईशा हिच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती. पण आता अभिनेत्री घटस्फोट झाल्याची कबुली दिली आहे. उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत असलेलं पती – पत्नीचं नातं अभिनेत्रीने मोडलं आहे. 11 वर्षांच्या संसारानंतर ईशा – भरत यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. भरत याच्या विवाहबाह्य संबंधामुळे दोघांचं नातं तुटल्याची चर्चा तुफान रंगत आहे. दरम्यान एका सोशल मीडिया युजरने भरत याच्या गर्लफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला होता.
काही दिवसांपूर्वी रेडिट युजरने एक पोस्ट शेअर केली होती. पोस्टमध्ये युजरने ईशा-भरत विभक्त होत असल्याची शक्यता वर्तवली होती आणि त्याने वर्तवलेली शक्यता खरी झाली आहे. युजर म्हणाला होता ‘कदाचित ईशा देओल तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. कारण तिने पतीसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं बंद केलं आहे आहे. एवढंच नाही तर भरत याचे परक्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा देखील दावा सोशल मीडिया युजरने केला आहे.
युजरने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ईशा हिचा पती भरत याला न्यू इयरच्या दिवशी बेंगळुरू येथे एका पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा भरत याची गर्लफ्रेंड देखील त्याठिकाणी होती असं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर, भरत याची गर्लफ्रेंड बेंगळुरू येथेच राहात असल्याचं युजरने सांगितलं आहे. युजरने केलेल्या दाव्यानुसार भरत याची गर्लफ्रेंड बेंगळुरू येथेच राहते…
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा – भरत यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. अभिनेत्री एक स्टेटमेंट जारी करत घटस्फोट झाल्याची घोषणा केली. अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे…हा निर्णय आमच्या मुलींसाठी फार महत्त्वाचा होता.’ गेल्या काही दिवसांपूर्वी ईशा – भरत विभक्त झाल्याची माहिती मिळत आहे.
ईशा- भरत यांचं लग्न…
ईशा देओल – भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 को इस्कॉन मंदिरात लग्न केलं. लग्नाच्या 5 वर्षांनंतर ईशा देओल हिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये देखील ईशा हिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. ईशा- भरत यांच्या दोन्ही मुलींची नावं राध्या आणि मिराया अशी आहेत. ईशा मुलींसोबत फोटो पोस्ट करत असते..