Gadar 2 मधील सनी देओलच्या हँडपंप सीनवर सावत्र बहीण ईशाची प्रतिक्रिया चर्चेत

सनी देओल आणि हँडपंपचा सीन म्हटलं की सर्वांना 'गदर' हा चित्रपट आवर्जून आठवतो. तब्बल 22 वर्षांनंतर जेव्हा 'गदर 2' प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातही हँडपंपचा सीन असायलाच हवा, असं दिग्दर्शकांचं मत होतं.

Gadar 2 मधील सनी देओलच्या हँडपंप सीनवर सावत्र बहीण ईशाची प्रतिक्रिया चर्चेत
ईशा देओल, सनी आणि बॉब देओलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 4:45 PM

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या या प्रचंड यशामुळे संपूर्ण देओल कुटुंबीय खुश आहेत. अभिनेत्री ईशा देओलनेही सावत्र भाऊ सनी देओलला पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी तिने ‘गदर 2’च्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. यावेळी ईशा देओल सनी देओल आणि बॉबी देओल हे तिघे भावंडं बऱ्याच वर्षांनंतर पहिल्यांदा एकत्र दिसले. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने ‘गदर 2’मधील हँडपंपच्या सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘गदर : एक प्रेम कथा’मधील हँडपंपचा सीन खूप गाजला होता. आता 22 वर्षांनंतरही सीक्वेलमधल्या हँडपंपच्या सीनची जोरदार चर्चा होत आहे.

हँडपंपच्या सीनवर ईशाची प्रतिक्रिया

सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल ईशा फारच खुश आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर ‘गदर 2’च्या कमाईच्या विक्रमाबाबत खास पोस्टसुद्धा शेअर केली होती. इतकंच नव्हे तर विविध मुलाखतींमध्येही ती देओल कुटुंबाबद्दल सकारात्मक बोलताना दिसली. ‘बॉलिवूड बबल’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ईशाला ‘गदर 2’मधील हँडपंपच्या सीनबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर ती म्हणाली, “हँडपंपचा सीन या चित्रपटाचा जीव आहे यात काही दुमत नाही आणि हा सीन मला खूप आवडला. हा फक्त सनी भाईचा हँडपंप दाखवण्याचा शॉट होता आणि ते पाहून लोक घाबरून पळून जातात. या सीनचा क्लोजअपच लोकांना घाबरवण्यासाठी पुरेसा होता.”

‘गदर 2’मधील हँडपंपचा सीन

22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटातील अभिनेता सनी देओलचा हँडपंप उखडतानाचा सीन प्रचंड चर्चेत आला होता. हा सीन आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. आता 22 वर्षांनंतर जेव्हा ‘गदर 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा पुन्हा एकदा त्याच सीनची चर्चा झाली. मात्र या सीक्वेलमधील हँडपंपच्या सीनमध्ये थोडा बदल करण्यात आला. अभिनेता विकी कौशलचे वडील आणि प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर सनी कौशल यांनी सीन दिग्दर्शित केला आहे.

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.