ऋषभ पंत सोबत ‘या’ अभिनेत्रीला करायचंय लग्न! मनातल्या भावना अखेर समोर आल्याच
Rishabh Pant : ऋषभ पंत याला 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने घातली लग्नाची मागणी? सर्वांसमोर म्हणाली..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा... सोशल मीडियावर देखील कायम रंगलेल्या असते अभिनेत्रीची चर्चा...
मुंबई | 24 डिसेंबर 2023 : क्रिकेटविश्वातील माजी क्रिकेटर ऋषभ पंत कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता देखील बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने ऋषभ याला लग्नासाठी मागणी घातल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने क्रिकेटरचं नाव न घेता, मोठं वक्तव्य केलं आहे. लग्नासाठी कसा जोडीदार हवा? असा प्रश्न विचारल्यानंतर अभिनेत्रीने मनातली इच्छ व्यक्त केली. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने खासगी आयुष्य आणि लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच उर्वशी हिला कसा जोडीदार हवा? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘माझा जोडीदार समजदार असायला हवा. तो साधा असायला हवा. कारण मला असं वाटतं मी प्रचंड जबाबदार आहे. त्यामुळे मला असं वाटतं मी अशा व्यक्तीसोबत राहू शकेल, जो जबाबदार आहे, ज्याला स्वतःची जबाबदारी कळते…’
पुढे उर्वशी हिला विचारण्यात आलं की, ‘तुला जबाबदार व्य्कती हवाय मग तो फिल्म इंडस्ट्री किंवा उद्योजक असेल तरी चालेल?’ यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी फिटनेस फ्रिक आहे . म्हणून माझा जोडीदार एथलीट असावा असं मला वाटतं..’ उर्वशी हिने एथलीट जोडीदार हवा असं म्हटल्यानंतर अभिनेत्रीला ऋषभ याच्यासोबत लग्न करायचं आहे… असा अंदाज चाहत्यांना वर्तवला आहे.
View this post on Instagram
उर्वशी हिने याआधी देखील अनेकदा ऋषभ पंत याच्याबद्दल वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली. जेव्हा ऋषभ याचा अपघात झाला होता, तेव्हा देखील अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटपटूची प्रकृती लवकरात लवकर स्थिर व्हावी म्हणून प्रार्थना केली होती. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.
उर्वशी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. पण तिला अभिनयातून स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. उर्वशी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.