AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री उशिरा वांद्र्यात अरबाजसोबत दिसली मलायका; युजर म्हणाले ‘अरबाजचा कोट घालून येणं गरजेचं होतं का?’

Malaika-Arbaaz: घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र दिसले मलायका-अरबाज; नेटकऱ्यांनी काढली अर्जुनची आठवण

रात्री उशिरा वांद्र्यात अरबाजसोबत दिसली मलायका; युजर म्हणाले 'अरबाजचा कोट घालून येणं गरजेचं होतं का?'
Malaika and ArbaazImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 04, 2023 | 11:21 AM
Share

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे नुकतेच न्यू-इअर सेलिब्रेशननंतर मुंबई परतले. त्यानंतर मलायका तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानसोबत दिसली. अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाला असला तरी मुलासाठी ते नेहमीच एकत्र दिसतात. मुलगा अरहान खानला एअरपोर्टवर सोडण्यासाठी असो किंवा मग त्याच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये एकत्र वेळ घालवण्यासाठी असो.. भूतकाळ विसरून मलायका-अरबाज नेहमीच एकत्र येतात. नुकताच या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मलायका आणि अरबाज हे मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र जाताना दिसले. यावेळी पापाराझींनी काढलेला या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

‘अरबाजचा कोट घालून येणं गरजेचं होतं का’, असा सवाल एका युजरने केला. तर अर्जुन कपूर कुठे आहे, असंही दुसऱ्याने विचारलं. ‘घटस्फोट घेतला असला तरी एकमेकांचे चांगले मित्र तर असू शकतात ना’, असंही एकाने म्हटलंय.

मलायकाचा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा शो चांगलाच गाजतोय. यामध्ये ती तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे करताना दिसली. मलायकाचा जेव्हा अपघात झाला, तेव्हा रुग्णालयात सर्वांत आधी तिच्यासमोर अरबाज खान दिसला, असंही तिने सांगितलं होतं.

या शोमध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि मैत्रीण फराह खानशी बोलताना मलायकाने सांगितलं की तिने अरबाजला प्रपोज केलं होतं. “मी अरबाजला प्रपोज केलं होतं. हे कोणालाच माहीत नाही. अरबाजने मला प्रपोज केलं नव्हतं. तर मी त्याला लग्नासाठी विचारलं होतं. मला लग्न करायचं आहे, तू तयार आहेस का, असा प्रश्न मी त्याला विचारला. त्यावर तो अत्यंत शांतपणे म्हणाला, तू तारीख आणि जागा ठरव”, असं मलायका म्हणाली होती.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.