Madhu Mantena | पूर्व जावई मधू मंटेनाच्या दुसऱ्या लग्नानंतर नीना गुप्ता यांच्या कमेंटने वेधलं लक्ष

नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड यांची मुलगी मसाबाशी मधू मंटेनाने 2015 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. अखेर 2019 मध्ये मसाबा आणि मधू विभक्त झाले.

Madhu Mantena | पूर्व जावई मधू मंटेनाच्या दुसऱ्या लग्नानंतर नीना गुप्ता यांच्या कमेंटने वेधलं लक्ष
Neena Gupta on Madhu Mantena weddingImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 10:32 AM

मुंबई : प्रसिद्ध निर्माता मधू मंटेनाने नुकतीच योग प्रशिक्षक इरा त्रिवेदीशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. मधू मंटेना हा फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताचा पूर्वाश्रमीचा पती आहे. आता लग्नानंतर त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत पत्नीसाठी भावना व्यक्त केल्या आहेत. त्या फोटोवर अभिनेत्री नीना गुप्ता यांनी कमेंट केली आहे. मसाबा ही नीना गुप्ता यांची मुलगी आहे. मसाबानेही काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न केलं होतं.

नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड यांची मुलगी मसाबाशी मधू मंटेनाने 2015 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. अखेर 2019 मध्ये मसाबा आणि मधू विभक्त झाले. त्यानंतर यावर्षी जानेवारी महिन्यात मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्राशी दुसऱ्यांदा लग्न केलं. सोमवारी मधू मंटेनाने इरा त्रिवेदीसोबतचा लग्नातील खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, ‘मी आता परिपूर्ण झालो. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी इतका खुश आणि समाधानी नव्हतो. मी जेव्हा इराला लग्नासाठी प्रपोज केलं तेव्हा ते शक्य नाही असं मला वाटलं होतं. पण काही ईश्वरी हस्तक्षेपानंतर अखेर हे लग्न शक्य झालं.’

हे सुद्धा वाचा

मधू मंटेनाने लग्नाचा हा फोटो पोस्ट करताच त्यावर नीना गुप्ता यांनी कमेंट केली. ‘शुभेच्छा’ अशी कमेंट त्यांनी लिहिली असून सध्या त्यांच्या याच कमेंटची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

पहा फोटो

मधू मंटेना 48 वर्षांचा असून त्याची पत्नी इरा त्रिवेदी ही त्याच्यापेक्षा वयाने नऊ वर्षांनी लहान आहे. “इराला पाहताच क्षणी मी तिच्याशी लग्न करणार असल्याचं ठरवलं होतं. पण लग्नाचा निर्णय घेण्यास इराने काही काळ घेतला. जर कोरोना महामारी नसती तर आतापर्यंत आमचं लग्न झालं असतं”, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

लग्नसोहळ्यानंतर रविवारी मधू मंटेना आणि इरा त्रिवेदी यांनी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला आमिर खान, हृतिक रोशन, सबा आझाद, राकेश रोशन, अनिल कपूर, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, सारा अली खान, राजकुमार राव, पत्रलेखा, रकुल प्रीत सिंह, जॅकी भगनानी यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.