सानिया मिर्झा – शोएब मलिक यांच्या घटस्फोटाचं कारण समोर, रिपोर्ट हैराण करणारे

Sania Mirza Life : ... याच कारणामुळे सानिया मिर्झा हिने शोएब मलिक याच्यासोबत असलेलं नातं मोडलं... धक्कादायक गोष्ट अखेर समोर आलीच... गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे सानिया - शोएब यांच्या नात्याची चर्चा...

सानिया मिर्झा - शोएब मलिक यांच्या घटस्फोटाचं कारण समोर, रिपोर्ट हैराण करणारे
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 8:57 AM

Sania Mirza Marriage : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शनिवारी शोएब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे. शोएब याने तिसऱ्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. क्रिकेटरच्या तिसऱ्या लग्नानंतर पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने एक मोठा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, लग्नात शोएब याच्या कुटुंबातील एकही सदस्य नव्हता… एवढंच नाही तर, सानिया हिने शोएब याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय का घेतला? याचं मोठं कारण देखील समोर आलं आहे.

सानिया मिर्झा हिच्या वडिलांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. शोएब याच्यासोबत सानिया हिचा ‘खुला’ झाल्याचं स्पष्टीकरण केलं आहे. ‘खुला’ म्हणजे, पत्नी कोणाच्या परवानगी शिवाय पतीला घटस्फोट देऊ शकते.. रिपोर्टमधून आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. शोएब याच्या अनेक विवाहबाह्य संबंधांना कंटाळून सानिया हिने घटस्फोटाचा निर्णय घेतला… असं देखील शोएब मलिक याच्या बहिणींकडून सांगण्यात येत आहे…

गेल्या अनेक दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक याच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. पण दोघांपैकी एकाने देखील यावर भूमिका मांडली नाही. अखेर शनिवारी सत्य समोर आलं. शोएब याने तिसरं लग्न केलं, तर सानिया तिच्या मुलासोबत आयुष्य जगत आहे. शोएब याने तिसऱ्या पत्नीसोबत फोटो पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

शोएब मलिक याचं खासगी आयुष्य

शोएब मलिक याने त्याच्या खासगी आयुष्यात देखील विक्रम रचला आहे. क्रिकेटपटूने तीन लग्न केली आहेत. शोएब याने पहिलं लग्न 2002 मध्ये आयेशा हिच्यासोबत केलं होतं. त्यानंतर शोएब याने दुसरं लग्न सानिया मिर्झा हिच्यासोबत केलं. लग्नानंतर दोघे दुबई याठिकाणी राहात होते. शोएब याच्यासोबत लग्नाच्या 8 वर्षांनंतर म्हणजे 2018 मध्ये सानिया हिने मुलाला जन्म दिला. दोघांचा मुलगा आता पाच वर्षांचा आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, शोएब याने तिसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट करत रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शोएब याने सोशल मीडियावर तिसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. शोएब याच्यासोबत सना हिचं दुसरं लग्न आहे. सना हिच्या पहिल्या पतीचं नाव उमैर जायस्वाल आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.