AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चे कंपनीचा थरकाप उडवणारं नाटक अलबत्या गलबत्याचा सेट चोरीला!

यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊनच्या या काळात सर्व थेटर सहित नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे ‘अलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या कोळसा बंदर, काळा चौकी येथील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता.

बच्चे कंपनीचा थरकाप उडवणारं नाटक अलबत्या गलबत्याचा सेट चोरीला!
अलबत्या गलबत्या
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 11:20 AM
Share

मुंबई : गेली 15-16 वर्षे नाट्य सृष्टीला सुपरहिट नाटकं देणारे अव्दैत थिएटरचे निर्माते राहुल मधुकर भंडारे (Rahul Bhandare) यांच्या “अलबत्या गलबत्या” (Albatya Galbatya) या लोकप्रिय नाटकाने अनेक विश्वविक्रम केले. नाटकाच्या कथेसोबतच या नाटकाचे आकर्षण ठरलेला नाटकाचा सेट देखील नाट्य क्षेत्रासहित प्रेक्षकांच्या मनाला खूप भावला होता.

यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊनच्या या काळात सर्व थेटर सहित नाट्यसृष्टी बंद आहे. त्यामुळे ‘अलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या कोळसा बंदर, काळा चौकी येथील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न देता सुरेश सावंत यांनी गोडाऊन मालकास खोटे सांगून, गोडाऊन मधून चोरून श्रेयस तळपदे यांच्या OTT प्लॅटफॉर्मच्या ‘भक्षक’ या एकांकिकेच्या शूटसाठी वापण्यात आला, असा आरोप निर्माते राहुल भंडारे यांनी केला आहे.

शासनाचे नियम मोडीत काढले!

महाराष्ट्र भरात नाट्यगृह चालू ठेवण्यास मनाई असताना देखील लॉकडाऊन काळातील शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत, बेकायदेशीररित्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे अलबत्याचा गलबत्या नाटकाचा सेट वापरून हे कमर्शिअल शूटिंगसाठी करण्यात आले होते.

साहित्य प्रदर्शित करू नका, अन्यथा…

‘अलबत्या गलबत्या’ या नाटकाशी संबंधित सर्व प्रापर्टी, सेट हे आणि इतर सगळी मालमत्ता अव्दैत थिएटर संस्थेची ‘Intellectual property’ असून, निर्माते राहुल भंडारे यांच्या परवानगीशिवाय वापरली असल्यामुळे ही शूटिंग कुठेही रिलीज करू नये, अन्यथा ‘Intellectual property rights’ अंतर्गत श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा अर्ज नाट्य निर्माते राहुल भंडारे यांनी शिवडी पोलीस स्थानकाला दिला आहे.

निर्माते राहुल भंडारे यांचा तक्रार अर्ज शिवडी पोलीस स्थानकत स्वीकारला गेला असून, पोलिसांमार्फत अभिनेते श्रेयस तळपदे याच्यासोबतच सुरेश सावंत यांची चौकशी होणार आहे. तर, सोबतच शासनाने घालून दिलेले लॉकडाऊनचे नियम मोडल्याबाबत देखील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती देखील, राहुल भंडारे यांनी केली आहे.

(Famous Drama Albatya Galbatya set stolen)

हेही वाचा :

बॉलिवूड पदार्पणापूर्वी ‘या’ व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती सारा आली खान!

 ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचा 300 एपिसोड्सचा टप्पा पूर्ण, प्रोमो शेअर करत मानले प्रेक्षकांचे आभार

नेटकऱ्यांकडून मिस्टर परफेक्शनिस्ट ट्रोल; म्हणाले, ‘ तुम्ही विभक्त झालात मग सोबत कशाला?’

‘जहांगीर’ च्या नावावरुन ट्रोल करणाऱ्यांवर स्वरा भास्करने साधला निशाणा, ट्रोलर्सना सांगितले “तुम्ही सर्व गाढव आहात”

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.