दोन लग्न केल्याचा अरमान मलिकला पश्चाताप, अखेर म्हणाला, हात जोडून…
बिग बॉस ओटीटी 3 सध्या चांगलेच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस ओटीटी पुढील काही दिवसांमध्ये धमाल करेल असेही सांगितले जातंय. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सर्वात जास्त चर्चेत अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी आहेत. विशेष म्हणजे पायल सध्या मोठे खुलासे करताना दिसत आहे.
बिग बॉस ओटीटी 3 सध्या चांगलेच चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत पोहचलाय. यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होताना दिसतंय. अरमान मलिक याच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक आहे. पायलला दोन मुले आणि एक मुलगी आहे तर कृतिका हिला एक मुलगा आहे. पायल हिच्यासोबत घटस्फोट न घेताच अरमान मलिक याने कृतिका हिच्यासोबत लग्न केले. आता अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नी एकत्र राहतात. सोशल मीडियावर व्लॉगच्या माध्यमातून मलिक कुटुंबिय खासगी आयुष्याबद्दल अपडेट देताना कायमच दिसते.
अरमान मलिक याने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये एक अत्यंत मोठा खुलासा केला. विशेष म्हणजे यावेळी अरमान मलिक हा त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसला. अरमान मलिक हा म्हणाला की, लोक म्हणतात दोन लग्न करायची आहेत. मी त्या लोकांना हात जोडून मोठी विनंती करू इच्छिचो.
भाऊ पहिल्या पत्नीसोबत आनंदी राहा. नाहीतर ती देखील सोडून जाईल. दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे मी खूप काही सहन केले. हेच नाही तर मरण्याची वेळही माझ्यावर आली होती. तो काळ वाईट आहे. मी त्यामधून बाहेर आलोय. सर्वचजण त्यामधून बाहेर येतील हे सांगणे फार अवघड आहे. प्रत्येकजणच त्यामधून बाहेर येईल, हे सांगणेही अवघड आहे.
थोडक्यात काय तर अरमान मलिक याला दोन लग्न केल्यामुळे पश्चाताप होताना दिसतोय. हेच नाही तर आता बिग बॉसच्या घरात अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल ही काही मोठे खुलासे करताना सातत्याने दिसत आहे. हेच नाही तर अरमान मलिक आणि कृतिकाबद्दल बोलताना पायल ही दिसली आहे.
कृतिका मलिक, पायल मलिक आणि अरमान मलिक हे मोठ्या संपत्तीचे मालक आहेत. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमान मलिक याने स्पष्ट केले की, तो 10 फ्लॅटचा मालक आहे. यासोबतच त्याच्याकडे अत्यंत आलिशान अशा गाड्या आहेत. हेच नाही तर 200 कोटींची संपत्ती ही त्याच्याकडे आहे.