AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif | कतरिना कैफ हिचा चेहरा पाहून चाहते हैराण, थेट विचारला ‘हा’ मोठा प्रश्न, अभिनेत्रीचा व्हिडीओ तूफान व्हायरल

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कतरिना कैफ हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कतरिना कैफ हिचा काही दिवसांपूर्वी फोन भूत हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कतरिना कैफ दिसली.

Katrina Kaif | कतरिना कैफ हिचा चेहरा पाहून चाहते हैराण, थेट विचारला 'हा' मोठा प्रश्न, अभिनेत्रीचा व्हिडीओ तूफान व्हायरल
| Updated on: Sep 06, 2023 | 5:46 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) ही कायमच चर्चेत असते. कतरिना कैफ ही पती विकी काैशल याच्यासोबत नेहमीच सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. कतरिना कैफ हिने बाॅलिवूडमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे. कतरिना कैफ हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या. कतरिना कैफ हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफ हिचा फोन भूत हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही.

कतरिना कैफ ही फोन भूत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली. इतकेच नाही तर बिग बाॅसच्या घरात देखील कतरिना कैफ ही फोन भूत चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचली. यावेळी कतरिना कैफ हिने घरातील सदस्यांना एक खास टास्क देखील दिला. मात्र, कतरिना कैफ हिचा हा चित्रपट फ्लाॅप गेला.

काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफ हिने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये कतरिना कैफ ही पती विकी काैशल याचा चित्रपट जरा हटके जरा बचकेचे प्रमोशन करताना दिसली. या चित्रपटात विकी काैशल याच्यासोबत सारा अली खान ही मुख्य भूमिकेत दिसली आणि या चित्रपटाने मोठा धमाका केला.

नुकताच कतरिना कैफ हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे कतरिना कैफ ही चर्चेत आहे. कतरिना कैफ ही एक अभिनेत्री असण्यासोबतच ती एक व्यावसायिक देखील आहे. अनेक ब्युटी केअर प्रोडक्टची ती मालकीन आहे. कतरिना कैफ हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका प्रोडक्टची माहिती देताना दिसत आहे.

कतरिना कैफ हिचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. अनेकांनी थेट कतरिना कैफ हिला विचारले की, तुझ्या चेहऱ्याला काय झाले? अनेकांचे म्हणणे आहे की, अगोदरप्रमाणे कतरिना कैफ हिचा चेहरा नॅचरल दिसत नाहीये. कतरिना कैफ हिने ओठांची सर्जरी केल्याचे देखील अनेकांनी म्हटले.

एका चाहत्याने म्हटले की, तुझे ओठ हे अगोदरच सुंदर दिसत होते, सर्जरी केल्याने ते खूपच जास्त सूजले आहेत. दुसऱ्याने लिहिले की, ओठांसोबतच कतरिना कैफ हिने तिच्या नाकाची सर्जरी केल्याचे देखील दिसत आहे. तिसऱ्याने लिहिले की, मला तुझे अगोदरचेच ओठ आवडत होते. अनेकांना या व्हिडीओमधील कतरिना कैफ हिचा चेहरा अजिबातच आवडलेले दिसत नाहीये.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.