Video| अरे हे काय बोलून गेला सैफचा लेक, इब्राहिम अली खान याचे बोलणे ऐकून सर्वजण हैराण, थेट म्हणाला, माझ्या तोंडात…
बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान याचा लेक इब्राहिम अली खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे इब्राहिम अली खान हा लवकरच सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. इब्राहिम अली खान याची मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याचा मोठा लेक इब्राहिम अली खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे. विशेष म्हणजे थेट सलमान खान याच्या चित्रपटामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी ही इब्राहिम अली खान याला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) हा बहीण सारा अली खान हिचा चित्रपट जरा हटके जरा बचके हा थिएटरमध्ये बघण्यासाठी आला होता. यावेळी सारा अली खान देखील सोबत होती. यावेळी पापाराझी यांच्यावर भडकताना इब्राहिम अली खान हा दिसला होता. पापाराझी हे फोटो (Photo) काढत असतानाच इब्राहिम अली खान हा म्हणाला होता की, इकडे काय आहे? तिकडे हिरोइंन आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी यांच्या चर्चा सुरू असून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर कधीच इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी यांनी भाष्य केले नाहीये. अनेकदा हे दोघे एकसोबत पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांना हजेरी लावतात.
नुकतात इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी हे एकसोबत थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी गेले होते. मात्र, पापाराझी यांना बघताच दोघे वेगवेगळे झाले. मात्र, तिथे पापाराझी यांना पाहून इब्राहिम अली खान हा भकडल्याचे बघायला मिळाले. सध्या इब्राहिम अली खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
View this post on Instagram
इब्राहिम अली खान हा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे फोनवर म्हणताना दिसत आहे की, ये इथे मीडिया माझ्या तोंडामध्ये घुसत आहे…एकदम तोंडामध्ये घुसत आहे…यानंतर इब्राहिम अली खान याला आपली चुक लक्षात आली आणि मग जाताना पापाराझी यांच्यासोबत हात मिळवताना इब्राहिम अली खान हा दिसला आहे.
इब्राहिम अली खान याचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसल्याचे दिसत आहे. अनेकांनी या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर इब्राहिम अली खान याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास देखील सुरूवात केली आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट कर म्हटले की, बाॅलिवू़मध्ये डेब्यू करण्याच्या अगोदरच या इब्राहिम अली खान याला माज आल्याचे दिसत आहे. इब्राहिम याचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.