फराह खानच्या दोन्ही मुली अभिनेत्रींच्याही पुढे; नेटकरी म्हणाले ‘यांनाही लाँच करा..’
कोरिओग्राफर फराह खानने 2008 मध्ये तीन मुलांना जन्म दिला. नुकतीच ती पापाराझींसमोर तिन्ही मुलांसोबत आली. यावेळी तिच्या मुलांना पाहून नेटकरीही थक्क झाले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मुंबई : 16 मार्च 2024 | बॉलिवूड स्टारकिड्सबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळंच कुतूहल असतं. सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, शनाया कपूर हे स्टारकिड्स अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतात. मात्र इंडस्ट्रीत असेही काही स्टारकिड्स आहेत, जे पहिल्यांदाच नेटकऱ्यांसमोर येत आहेत. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानची मुलं पहिल्यांदाच सोशल मीडियावर चर्चेत आली आहेत. तीन मुलांसोबतचा तिचा व्हिडीओ पापाराझींनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये फराहच्या मुलांना इतकं मोठं झाल्याचं पाहून नेटकरीही विविध प्रतिक्रिया देत आहेत.
या व्हिडीओमध्ये फराह तिच्या तिन्ही मुलांसोबत दिसून येत आहे. एका बाजूला तिचा मुलगा आहे तर दुसऱ्या बाजूला तिच्या दोन्ही मुली आहेत. आन्या आणि दिवा अशी तिच्या मुलींची नावं आहेत. आपल्या तिन्ही मुलांसोबत फराह पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘तिघेही किती मोठे झाले आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘सुंदर कुटुंब’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘दोघी मुली फराह मॅमसारख्या गोड आहेत’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.
View this post on Instagram
फराह खानने शिरीष कुंदरशी 2004 मध्ये लग्न केलं. शिरीष हा फिल्म एडिटर आणि फिल्ममेकर आहे. या दोघांनी एकमेकांच्या चित्रपटांसाठी अनेकदा एकत्र काम केलंय. ‘जान-ए-मन’, ‘ओम शांती ओम’, ‘तीस मार खान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी काम केलंय. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2008 मध्ये फराहने तीन मुलांना जन्म दिला.
फराह कॉलेजमध्ये असताना मायकल जॅक्सनचा ‘थ्रिलर’ हा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. या गाण्याने ती इतकी प्रभावित झाली की तेव्हापासून तिला डान्सची आवड निर्माण झाली. फराहने डान्सचं कोणतंही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. ती स्वत:च सरावाने डान्स शिकली आणि त्यानंतर डान्स ग्रुप तयार केला. 1992 मध्ये जेव्हा प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी ‘जो जिता वहीं सिकंदर’ या चित्रपटातून माघार घेतली, तेव्हा फराहने ही संधी आपल्या हातात घेतली. या चित्रपटानंतर फराहने कधी मागे वळून पाहिलं नाही. 1994 मध्ये ‘कभी हा कभी ना’ या चित्रपटाच्या सेटवर तिची शाहरुख खानशी पहिल्यांदा भेट झाली. तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. फराहला सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.