Fardeen Khan| ‘तिने मला मारलं…’, पत्नीबद्दल असं का म्हणाला फरदीन; लग्नाच्या १८ वर्षांनंतर घेणार घटस्फोट!

पत्नीसाठी लिहिलेली फरदीन याची जुनी पोस्ट चर्चेत; लग्नाच्या १८ वर्षांनंतर घटस्फोटाच्या चर्चा, अभिनेत्याचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर

Fardeen Khan| 'तिने मला मारलं...', पत्नीबद्दल असं का म्हणाला फरदीन; लग्नाच्या १८ वर्षांनंतर घेणार घटस्फोट!
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 2:51 PM

मुंबई | 31 जुलै 2023 : अरबाज खान – मलायका अरोरा, हृतिक रोशन – सुझान खान, सोहेल खान – सीमा सजदेह, करिश्मा कपूर – संजय कपूर यांच्यानंतर अभिनेता अभिनेता फरदीन खान आणि पत्नी नताशा माधवानी यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, फरदीन आणि नताशा यांच्या खासगी आयु्ष्यात सतत वाद होत असल्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगत आहे. घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना अभिनेत्याने पत्नीसाठी लिहिलेली पोस्ट देखील तुफान चर्चेत आली आहे. फरदीन आणि नताशा यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाली आहे. इतके वर्ष सुखी संसार केल्यानंतर घटस्फोट का घेत आहेत? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना अभिनेत्याच्या जुन्या पोस्टची देखील चर्चा तुफान रंगत आहे. सध्या ज्या पोस्टची चर्चा रंगत आहे ती पोस्ट अभिनेत्याने १६ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीसाठी लिहिली होती. पोस्टमध्ये अभिनेता म्हणाला होता की, ‘१६ वर्षांपूर्वी याच दिवशी जोरात घोरत होतो. मी नताशाचा आभारी आहे की, तेव्हा तिने मला मारलं नाही…’

पुढे अभिनेता म्हणाले, ‘मला मारण्यासाठी तिच्याकडे अनेक कारणं आहेत. पण ती माझ्यावर प्रेम करते…’ असं म्हणत अभिनेत्याने पत्नीला शुभेच्छा दिल्या होत्या. एवढंच नाही तर, तेव्हा फरदीन यांनी लग्नापूर्वीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर फरदीन आणि नताशा यांनी लग्न केलं. नताशा लंडन याठिकाणी जात असताना अभिनेत्याने नताशा हिला लग्नासाठी मागणी घातली. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. २००५ मध्ये नताशा माधवानी आणि फरदीन खान यांनी लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. फरदीन दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचे पूत्र आहेत. अभिनेता फरदीन सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

गेल्या एक वर्षापासून दोघे एकत्र राहत नाहीत. अद्याप दोघांनी देखील रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. अभिनेत्याच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं नताशा मुमताज यांची मुलगी आहे.

अभिनेता फरदीन याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘विस्फोट’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यानतंर चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. अभिनेत्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.