जन्मानंतर लेकाला स्वीकारण्यास वडिलांचा नकार, आईचे पाय धुवून पिणारा ‘हा’ मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार

पोटच्या मुलाला स्वीकारण्यास वडिलांनीच दिला नकार, मोठा झाल्यानंतर आईचे पाय धुवून पिणारा 'हा' सुपरस्टार कोण? अभिनेत्याची ओळख पटल्यानंतर तुम्हाला बसेल मोठा धक्का

जन्मानंतर लेकाला स्वीकारण्यास वडिलांचा नकार, आईचे पाय धुवून पिणारा 'हा' मुलगा आज बॉलिवूडचा सुपरस्टार
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 9:53 AM

मुंबई | सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्यामाध्यमातून असंख्य गोष्टी समोर येत असतात. सोशल मीडियावर सर्वात जास्त सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहते देखील आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या लहानपणीचे देखील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो पाहिले असतील. आता देखील एका प्रसिद्ध सेलिब्रिटीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पाहिल्यानंतर आणि अभिनेत्याची ओळख पटल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल… या अभिनेत्या संपूर्ण भारत ओळखतो..

आज बॉलिवूडच्या सुपरस्टार म्हणून ओळख मिळवलेल्या आभिनेत्याच्या आयुष्यात जन्मापासून मोठी संकटं आली. मुलाच्या जन्मानंतर वडिलांनी स्वीकारण्यास नकार दिला. तर आईच्या प्रेमाने अभिनेत्याला सर्वकाही मिळवून दिलं. आज फोटोत दिसणाऱ्या लहान मुलाकडे पैसा, प्रसिद्धी, संपत्ती सर्वकाही आहे.. फोटोत दिसणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता गोविंदा आहे..

बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्यासाठी अभिनेत्याने अनेक गोष्टींचा सामना केला. फक्त प्रोफेशनल आयुष्यातच नाही तर, खासगी आयुष्यात देखील गोविंदाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. गोविंदाने एकदा सांगितलं होतं की, अभिनेत्याच्या जन्मानंतर वडिलांनी गोविंदाला स्वीकारण्यास नकार दिला.

एका मुलाखतीत गोविंदा म्हणाले होते की, ‘मझ्या वडिलांना असं वाटत होतं आई माझ्यामुळे त्यांच्यापासून विभक्त होत साध्वी होण्याचा निर्णय घेत आहे. काही दिवसांनंतर जेव्हा लोकांनी आईला सांगितलं मुलगा खुपच छान आहे. तेव्हा माझ्यावर त्यांनी प्रेम केलं…’ गोविंदा स्वतःच्या आईवर प्रचंड प्रेम करतो.

गोविंदा आईला एखाद्या देवीप्रमाणे पुजतो. आईचे पाय धुवून पित असल्याचं देखील अभिनेत्याने अनेकदा सांगितलं. गोविंदा आज बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेता आहे. गोविंदाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गोविंदाला पाहिल्यानंतर अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र गोविंदाची क्रेझ होते. गोविंदाच्या प्रत्येक सिनेमाने चाहत्यांने भरभरुन मनोरंजन केलं. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत गोविंदाने स्क्रिन शेअर केली आहे. माधुरी दीक्षित, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, रवीना टंडन, ऐश्वर्या राय यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींसोबत अभिनेत्याने स्क्रिन शेअर केली आहे.

गोविंदा याने ‘राजा बाबू’, ‘हीरो नंबर 1’, ‘आंटी नंबर 1’, ‘आंखें’, ‘हद कर दी आपने’, ‘नसीब’, ‘कूली नंबर 1’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.. आज देखील गोविंदा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शिवाय गोविंदाच्या चाहत्यांची संख्या देखील कमी झालेली नाही.

आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.