प्रभू श्रीराम यांना मांसाहारी म्हटल्यावरून वाद; नयनताराच्या ‘अन्नपूर्णी’ चित्रपटाविरोधात FIR

'अन्नपूर्णी' हा एक तमिळ चित्रपट असून त्यामध्ये नयनतारा, जय आणि सत्यराज यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटात अन्नपूर्णी ही शेफ बनण्याचं स्वप्न पाहते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनेनं या चित्रपटाविरोधात FIR दाखल केली आहे.

प्रभू श्रीराम यांना मांसाहारी म्हटल्यावरून वाद; नयनताराच्या 'अन्नपूर्णी' चित्रपटाविरोधात FIR
Nayanthara film AnnapooraniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 12:49 PM

मुंबई : 10 जानेवारी 2024 | नयनताराची मुख्य भूमिका असलेल्या ‘अन्नपूर्णी’ या चित्रपटावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना नेते रमेश सोलंकी यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. चित्रपटात प्रभू श्रीराम यांचा अपमान करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. ‘अन्नपूर्णी’ हा चित्रपट हिंदूंविरोधी असून त्यात काही वादग्रस्त दृश्येही असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यापैकी एका सीनमध्ये श्रीराम हे मांसाहारी होते असं म्हटलं गेलंय. इतकंच नव्हे तर या चित्रपटातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सोलंकी यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्माते आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ‘नेटफ्लिक्स इंडिया’विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

रमेश सोलंकी यांनी एक्सवर याबद्दलची पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटातील डायलॉग्स आणि सीन्सवर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. ‘संपूर्ण जग हे प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करत असताना काही लोकांनी हिंदूविरोधी चित्रपट ‘अन्नपूर्णी’ला प्रदर्शित केलं आहे. यामध्ये अभिनेता फरहानने अभिनेत्रीला असं म्हणून मांसाहार खाण्यास प्रवृत्त केलंय की प्रभू श्रीरामसुद्धा मांसाहारी होते. एकीकडे चित्रपटात नायिकेचे पुजारी पिता हे भगवान विष्णूसाठी नैवेद्य बनवत असतात, तर दुसरीकडे त्यांची मुलगी मांसाचं जेवण बनवत असते, इफ्तार करते आणि नमाज पठण करते. या चित्रपटाद्वारे जाणूनबुजून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. दिग्दर्शक नीलेश कृष्णा, अभिनेत्री नयनतारा, निर्माते जतिन सेठी, आर. रवींद्रन आणि पुनीत गोयंका, नेटफ्लिक्स इंडियाच्या प्रमुख मोनिका के आणि झी स्टुडिओचे मुख्य व्यवसाय अधिकारी शारिक पटेल यांच्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी करतो’, असं त्यांनी लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपटातील कोणकोणत्या सीन्सवर आक्षेप?

  • बिर्याणी बनवण्याआधी मंदिराच्या पुजाऱ्यांची मुलगी हिजाब घालून नमाज पठण करते.
  • अभिनेत्रीचा मित्र फरहान तिचं ब्रेनवॉश करून तिच्याकडून मांस कापून घेतो. प्रभू श्रीराम आणि माता सीता हे सुद्धा मांसाहारी होते, असं तो तिला सांगतो.
  • चित्रपटात अभिनेत्री मंदिरात न जाता फरहानच्या घरी रमजान इफ्तार करण्यासाठी जाते. तिचे वडील मंदिरात संध्या आरती करत असतात, आजी माळ जपत असते तेव्हाच अभिनेत्रीचं मांस खातानाचं आणि खाऊ घालतानाचं दृश्य दाखवलंय.
  • अभिनेत्रीचे वडील एका मंदिराचे प्रधान पुजारी असतात. त्यांच्या सात पिढ्या विष्णू देवासाठी नैवेद्य बनवत असतात. मात्र त्यांची मुलगी मांसाहार बनवताना आणि खाताना दाखवलंय.
  • चित्रपटात फरहान नावाच्या एका कलाकाराने म्हटलंय की प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, शिव आणि मुरूगन यांनीसुद्धा मांसाहार केला आहे.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.