AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 विजेता एमसी स्टॅनवर अभिनेत्याने साधला निशाणा; म्हणाला “पुढच्या वेळी लोकांची हीच स्ट्रॅटेजी..”

ग्रँड फिनालेपूर्वी बिग बॉसचा प्रेक्षक दोन गटांमध्ये विभागला गेला होता. शिव ठाकरे हा या सिझनचा विजेता ठरेल असं एका गटाला वाटत होतं. तर दुसऱ्या गटाचा मोठा पाठिंबा प्रियांका चहर चौधरीला होता.

Bigg Boss 16 विजेता एमसी स्टॅनवर अभिनेत्याने साधला निशाणा; म्हणाला पुढच्या वेळी लोकांची हीच स्ट्रॅटेजी..
MC Stan and Gautam VigImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 14, 2023 | 10:03 AM
Share

मुंबई: प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन हा बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचा विजेता ठरला. स्टॅनच्या विजेतेपदावरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कारण ग्रँड फिनालेपूर्वी बिग बॉसचा प्रेक्षक दोन गटांमध्ये विभागला गेला होता. शिव ठाकरे हा या सिझनचा विजेता ठरेल असं एका गटाला वाटत होतं. तर दुसऱ्या गटाचा मोठा पाठिंबा प्रियांका चहर चौधरीला होता. या दोघांपैकी कोणीतरी एक विजेता ठरेल, असे अंदाज वर्तवले जात होते. आता बिग बॉस 16 चे माजी स्पर्धक गौतम विज आणि अंकित गुप्ता यांनी प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे एमसी स्टॅनवर निशाणा साधला आहे.

गौतम विजची प्रतिक्रिया

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये गौतम आणि अंकितने त्यांच्या आगामी ‘जुनूनियत’ या म्युझिकल सीरिजचं प्रमोशन केलं. या प्रमोशननंतर दिलेल्या एका मुलाखतीत गौतमने बिग बॉसच्या विजेतेपदावर आश्चर्य व्यक्त केलं. “हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का होता. कारण प्रियांका विजेती ठरेल अशी आम्ही अपेक्षा करत होतो. ती दररोज सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंडमध्ये होती”, असं गौतम म्हणाला.

एमसी स्टॅनला टोला?

विजेता एमसी स्टॅनवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत गौतम पुढे म्हणाला, “प्रियांकानंतर शिव तरी विजेता ठरेल अशी माझी अपेक्षा होती. एमसी जिंकलाय.. चांगली गोष्ट आहे की तो जिंकला आहे. उशिरा गेम समजला पण चांगली बाब आहे की समजलं. तर माझ्या मते पुढच्या वेळी ही लोकांची स्ट्रॅटेजी असली पाहिजे की उशिरा गेम समजून घ्या आणि ट्रॉफी घेऊन जा.” हे ऐकताच त्याच्या बाजूला उभा असलेला अंकित मिश्किलपणे हसतो.

अंकित गुप्ताची प्रतिक्रिया

प्रियांकाचा खास मित्र आणि सहअभिनेता अंकित गुप्तानेही बिग बॉसच्या विजेतेपदावर प्रतिक्रिया दिली. प्रियांकाची बाजू घेत तो म्हणाला, “मी बिग बॉसमध्ये जिंकण्यासाठी भाग घेतलाच नव्हता. मला तिला जिंकताना पहायचं होतं. अगदी पहिल्या दिवसापासून ती चांगला खेळ खेळत होती. खऱ्या गोष्टींसाठी ती भांडली, समस्यांविरोधात तिने आवाज उठवला आणि मैत्रीत प्रामाणिकता जपली.” प्रियांका आणि शिव यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि तेच त्यांचं यश आहे, असं म्हणत गौतमने दोघांचं कौतुक केलं.

प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन, शालीन भनोट, अर्चना गौतम आणि शिव ठाकरे या पाच जणांमध्ये चुरस रंगली होती. त्यात रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारली. त्याला बिग बॉस 16 ची ट्रॉफी आणि 31 लाख 80 हजार रुपये बक्षिसाची रक्कम मिळाली.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.