AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Friends फेम मॅथ्यू पेरीचा मृत्यू कशामुळे? ऑटोप्सी रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

'फ्रेंड्स' हा सिटकॉम पाहिला नसेल अशी व्यक्ती क्वचितच सापडेल. या सिटकॉममध्ये चँडलर बिंगची भूमिका साकारणारा अभिनेता मॅथ्यू पेरी ऑक्टोबर महिन्यात त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. आता त्याच्या ऑटोप्सी रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे.

Friends फेम मॅथ्यू पेरीचा मृत्यू कशामुळे? ऑटोप्सी रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
Matthew PerryImage Credit source: Twitter
| Updated on: Dec 16, 2023 | 1:17 PM
Share

लॉस एंजिलिस : 16 डिसेंबर 2023 | ‘फ्रेंड्स’ या सर्वांत लोकप्रिय सिटकॉममध्ये चँडलर बिंगची भूमिका साकारणारा अभिनेता मॅथ्यू पेरी याचं ऑक्टोबर महिन्यात निधन झालं होतं. त्याच्या निधनाच्या वृत्ताने जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता मॅथ्यूच्या निधनामागचं कारण समोर आलं आहे. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मृत्यूमागचं नेमकं कारण समजलं आहे. ऑटोप्सी रिपोर्टनुसार, मॅथ्यूचं निधन पॉवरफुल केटामाइनच्या ओव्हरडोसमुळे झालं होतं. ऑक्टोबर महिन्यात तो त्याच्या राहत्या घरातील स्विमिंग पूलमध्ये बेशुद्धावस्थेत आढळला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं.

उच्च प्रमाणात आढळलं केटामाइन

मॅथ्यूच्या निधनाच्या जवळपास सात आठवड्यांनंतर त्याचा ऑटोप्सी रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये असं म्हटलंय की टॉक्सिकोलॉजी तपासणीत मॅथ्यूच्या शरीरात हेलुसीनोजेनिक प्रॉपर्टीजसोबतच एक शॉर्ट ॲक्टिंग ॲनस्थेटिक केटामाइन उच्च प्रमाणात आढळलं होतं. केटामाइन हे सर्वसाधारणपणे सर्जिकल केअरमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य ॲनेस्थेशियासाठी संबंधित आहे. केटामाइनच्या उच्च प्रमाणामुळे मॅथ्यूच्या हृदयाचे ठोके वाढले आणि तो बेशुद्ध झाला होता. त्यानंतर पूलच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

केटामाइन कशासाठी वापरलं जातं?

केटामाइन हे सुन्न आणि हॅलुसिनोजेनिक प्रभावांसाठी बेकायदेशीरपणे वापरलं जातं. हेच औषध डॉक्टरांद्वारे ॲनेस्थेटिक म्हणूनही वापरलं जाऊ शकतं. त्याचसोबत संशोधक त्याचा मानसिक आरोग्यासाठी उपचार म्हणून वापर करता येऊ शकतो का यावर संशोधन करत आहेत. मॅथ्यूने त्याच्या आत्मचरित्रात लिहिलं होतं की व्यसनाचा सामना करताना तो दररोज केटामाइनवर अवलंबून असायचा. यामुळे त्याच्या वेदना कमी झाल्या आणि नैराश्याचा सामना करण्यास मदत झाली, असं त्याने म्हटलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Matthew Perry (@mattyperry4)

रिपोर्टमध्ये उल्लेख केलेल्या साक्षीदाराच्या मुलाखतीनुसार, मॅथ्यू हा नैराश्याचा सामना करण्यासाठी केटामाइन इन्फ्युजन थेरपी घेत होता. मात्र त्याची अखेरची ट्रिटमेंट ही मृत्यूच्या दीड आठवड्याआधी झाली होती. एग्झामिनरला मॅथ्यूच्या घरी कोणतंच मद्य किंवा अवैध औषधं आढळली नव्हती. त्याच्या लिव्हिंग रुममध्ये काही निकोटीन वेपिंग प्रॉडक्ट आणि एक इनहेलर सापडलं होतं. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलंय की त्याने मृत्यूच्या दोन आठवड्याआधी धुम्रपान बंद केलं होतं.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.