Gadar 2 VS OMG 2 | बॉलिवूडचा बंपर वीकेंड.. ‘गदर 2’, ‘OMG 2’च्या कलेक्शनने ‘पठाण’ला टाकलं मागे

उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरयाणा याठिकाणी दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षकांमध्ये क्रेझ पहायला मिळतेय. सोमवारी या दोन्ही चित्रपटांची खरी परीक्षा असेल. मात्र मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी सुट्टीचा दिवस असल्याने थिएटरमध्ये पुन्हा गर्दी होऊ शकते.

Gadar 2 VS OMG 2 | बॉलिवूडचा बंपर वीकेंड.. 'गदर 2', 'OMG 2'च्या कलेक्शनने 'पठाण'ला टाकलं मागे
गदर 2 आणि OMG 2 चं बॉक्स ऑफिस कलेक्शनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 8:42 AM

मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ आणि ‘ओह माय गॉड 2’ या दोन चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिसवर आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. कारण बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडचे चित्रपट दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. शुक्रवारपासून रविवारपर्यंत उत्तर भारतातील जवळपास सर्व शहरांमधील थिएटर्स हाऊसफुल्ल होते. बॉलिवूड चित्रपटांबद्दलची क्रेझ कमी झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हीच क्रेझ ‘गदर 2’मुळे पुन्हा पहायला मिळतेय. याआधी शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. 2023 या वर्षांत ‘पठाण’ने नवे विक्रम रचले. त्यानंतर आता ‘गदर 2’ आणि ‘OMG 2’ या चित्रपटांनी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणलं आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवलेले सर्व अंदाज जवळपास खरे ठरत आहेत. हाऊसफुल शो आणि कलेक्शनच्या बाबतीत हा वीकेंड हिंदी चित्रपटांसाठी आतापर्यंतचा सर्वांत मोठा वीकेंड ठरला आहे. ‘गदर 2’ने पहिल्या तीन दिवसांत तब्बल 130 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला. तर ‘OMG 2’ने या तीन दिवसांत जवळपास 43 कोटी रुपयांची कमाई केली. या दोन्ही चित्रपटांची कमाई जोडली तर हा आकडा 173 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले. तर शाहरुखच्या ‘पठाण’ने तीन दिवसांत 167 कोटी रुपये कमावले होते.

हे सुद्धा वाचा

चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ हा एकच चित्रपट त्यावेळी प्रदर्शित झाला होता. त्याची दुसऱ्या कोणत्या चित्रपटाशी टक्कर नव्हती. जर ‘गदर 2’सुद्धा सिंगल रिलीज झाला असता तर त्याच्या कमाईची बरोबरी थेट ‘पठाण’शी झाली असती. सध्या ‘गदर 2’ या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ आणि रजनीकांत यांच्या ‘जेलर’शी होतेय.

उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरयाणा याठिकाणी दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षकांमध्ये क्रेझ पहायला मिळतेय. सोमवारी या दोन्ही चित्रपटांची खरी परीक्षा असेल. मात्र मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी सुट्टीचा दिवस असल्याने थिएटरमध्ये पुन्हा गर्दी होऊ शकते. प्रेक्षकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून या चित्रपटांचे शोज वाढवले जात आहेत. माऊथ पब्लिसिटीचा या दोन्ही चित्रपटांना फायदा होताना दिसतोय.

लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात बरेच बॉलिवूड चित्रपट अपयशी ठरले. त्याच वेळी दाक्षिणात्य चित्रपटांची लाट आली. ‘पठाण’शिवाय ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता पहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा शोज हाऊसफुल होऊ लागले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.