Gadar 2 | ‘गदर 2’ अजूनही पाहिला नसेल तर आधी कमाईचा हा आकडा नक्की पहा; चाहत्यांची तुफान क्रेझ

चित्रपटाच्या या यशाचं श्रेय सनी देओलने त्यांच्या कुटुंबातील एका खास व्यक्तीला दिलं आहे. विशेष म्हणजे या खास व्यक्तीचा नुकताच देओल कुटुंबात समावेश झाला आहे. ‘गदर 2’ला मिळणारं हे यश म्हणजे सून द्रिशा आचार्यचा पायगुण आहे, असं सनी देओल मानतो.

Gadar 2 | 'गदर 2' अजूनही पाहिला नसेल तर आधी कमाईचा हा आकडा नक्की पहा; चाहत्यांची तुफान क्रेझ
Gadar 2Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 10:39 AM

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. स्वातंत्र्यदिनी या चित्रपटाने तब्बल 55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर बुधवारी चित्रपटाच्या कमाईने 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अवघ्या सहा दिवसांत ‘गदर 2’ने ही दमदार कामगिरी केली आहे. या वर्षातील हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, गुरूवारी या चित्रपटाच्या कमाईचा एकूण आकडा 250 कोटी रुपयांचा टप्पा पार करू शकतो. आतापर्यंत भारतात ‘गदर 2’ने जवळपास 263.48 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

2023 हे वर्ष देओल कुटुंबासाठी खूपच खास ठरतोय. यावर्षी जून महिन्यात सनी देओलचा मुलगा करण देओल विवाहबद्ध झाला. त्यानंतर दिग्गज अभिनेते धर्मेंद्र हे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकले. आता सनी देओलचा ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करतोय. देओल कुटुंबाचं हे यश पाहून बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मंगळवारी आमिर खानने मुलगा आझाद खानसह धर्मेंद्र आणि बॉबी देओल यांची भेट घेतली. या भेटीला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चित्रपटाच्या या यशाचं श्रेय सनी देओलने त्यांच्या कुटुंबातील एका खास व्यक्तीला दिलं आहे. विशेष म्हणजे या खास व्यक्तीचा नुकताच देओल कुटुंबात समावेश झाला आहे. ‘गदर 2’ला मिळणारं हे यश म्हणजे सून द्रिशा आचार्यचा पायगुण आहे, असं सनी देओल मानतो. मुलगा करण देओलची पत्नी द्रिशा ही ‘गृहलक्ष्मी’ असल्याचं त्याने म्हटलंय. देओल कुटुंबात द्रिशा येताच अनेक चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या येण्यानेच ही समृद्धी आणि यश मिळाल्याचं सनी देओल मानत आहे.

हे सुद्धा वाचा

केवळ चित्रपटाचं यशच नव्हे तर सावत्र बहीण ईशा देओल हिच्यासोबतचेही दुरावे मिटले आहेत. ईशाने तिच्या भावासाठी चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. त्यावेळी सनी देओल आणि बॉबी देओलने आवर्जून हजेरी लावली होती. बऱ्याच वर्षांनंतर हे तिघे एकत्र मीडियासमोर दिसले होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.