‘अँटी पाकिस्तान’च्या टीकेवर Gadar 2 च्या दिग्दर्शकांचं उत्तर; म्हणाले ‘उलट मुस्लीमच आमचे..’

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' हा चित्रपट मुस्लीम आणि पाकिस्तानविरोधी असल्याची टीका काही जणांकडून झाली. या टीकेवर आता दिग्दर्शकांनी उत्तर दिलं आहे. अँटी पाकिस्तानच्या टीकेवर ते म्हणाले..

'अँटी पाकिस्तान'च्या टीकेवर Gadar 2 च्या दिग्दर्शकांचं उत्तर; म्हणाले 'उलट मुस्लीमच आमचे..'
Gadar 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 10:53 AM

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : सनी देओलचा ‘गदर 2’ हा 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला तर दुसरीकडे विशिष्ट वर्गाकडून हा चित्रपट ‘अँटी मुस्लीम’ (मुस्लीमविरोधी) असल्याची टीका झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी हे आरोप फेटाळले आहेत. ‘गदर 2’ हा चित्रपट एकतेचा संदेश देतो, असं त्यांनी म्हटलंय. त्याचसोबत मुस्लीम समुदायाविषयी प्रचंड आदर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

अनिल शर्मा यांची प्रतिक्रिया

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ‘गदर’चे दोन्ही भाग दिग्दर्शित करण्याची संधी मिळाल्याबद्दल स्वत:ला नशीबवान मानत असल्याचं म्हटलंय. एक कलाकार म्हणून हे जग कसं काम करतं याविषयी मला माहिती नसली तरी लोकांना पाहण्याची इच्छा होती म्हणून ‘गदर 2’ बनवल्याचं शर्मा यांनी सांगितलं. “या चित्रपटात मुस्लीमविरोधी काहीच नाही. प्रेक्षक गीता आणि कुराण या दोन्ही गोष्टी का स्वीकारू शकत नाही? उलट आमच्या चित्रपटाचा बहुतांश प्रेक्षक हा मुस्लीम समुदायातीलच आहे”, असंही अनिल शर्मा म्हणाले.

काय म्हणाला सनी देओल?

याआधी अभिनेता सनी देओलनेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. “मला असं वाटतं की दोन्ही देशातील लोकांना वाद नकोच आहे. दोन्ही बाजूला सर्वसामान्य लोकच आहेत. पण संपूर्ण चित्रपटादरम्यान, माझ्या कोणत्याच भूमिकेतून मी कोणाचाही अपमान केला नाही. माझा त्यावर विश्वास नाही. किंबहुना तारा सिंग या भूमिकेचंही व्यक्तिमत्व तसं नाही. अशा चित्रपटांवर माझा पूर्ण विश्वास आहे”, असं सनी देओल म्हणाला होता.

हे सुद्धा वाचा

‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत 508.97 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तारा सिंग आणि सकीनाची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा हिट ठरली आहे. 22 वर्षांनंतरही चाहत्यांमध्ये ‘गदर’विषयीची क्रेझ कायम आहे.

‘गदर 2’ कशामुळे हिट?

‘गदर 2’ला बॉक्स ऑफिसवर इतका उत्तम प्रतिसाद का मिळाला यामागचं कारण निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तो म्हणाला, “गदर 2 ची संपूर्ण मार्केटिंग गदर 1 चित्रपटाबाबत होती. म्हणूनच या चित्रपटाला इतका दमदार प्रतिसाद मिळाला. कारण लोकांना 22 वर्षांपूर्वीचा गदर आठवला. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सनी देओल आणि अमीषा पटेलसुद्धा तारा सिंग आणि सकिनाच्या वेशभूषेतच दिसून आले. यातील गाण्यांना नव्या पद्धतीने प्रदर्शित करण्यात आलं. विशेष म्हणजे या चित्रपटाने कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत.”

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.