Gadar 2 | तारा सिंग-सकिनाच्या लव्हस्टोरीत ‘या’ दिग्गज अभिनेत्याची एण्ट्री; ‘गदर 2’बद्दल मोठी अपडेट

'गदर 2'च्या टीझर आणि गाण्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्याआधी काही दिवस असताना त्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. सनी देओल आणि अमीषा पटेलच्या या चित्रपटात एका दिग्गज अभिनेत्याचं नाव जोडलं जात आहे.

Gadar 2 | तारा सिंग-सकिनाच्या लव्हस्टोरीत 'या' दिग्गज अभिनेत्याची एण्ट्री; 'गदर 2'बद्दल मोठी अपडेट
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 12:10 PM

मुंबई : सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘गदर 2’ हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित होणार आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यामुळे सीक्वेलबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘गदर 2’च्या टीझर आणि गाण्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्याआधी काही दिवस असताना त्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. सनी देओल आणि अमीषा पटेलच्या या चित्रपटात एका दिग्गज अभिनेत्याचं नाव जोडलं जात आहे.

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर डबिंक करताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये खुलासा करत लिहिलं आहे, ‘नाना पाटेकर यांनी गदर 2 चित्रपटासाठी व्हॉइस ओव्हर केलं आहे. त्यांनी या चित्रपटाला आपला आवाज दिला आहे.’ चित्रपटाच्या सुरुवातीला जी पार्श्वभूमी दाखवली जाणार आहे, त्याला नानांनी आवाज दिला आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटाला अभिनेते ओम पुरी यांनी असाच आपला आवाज दिला होता. ओम पुरी आता या जगात नाहीत. त्यामुळे सीक्वेलमध्ये प्रेक्षकांना नाना पाटेकर यांच्या आवाजातील पार्श्वभूमी ऐकायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

गदर 2 हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच जोरदार चर्चेत आला आहे. अमीषाने रविवारी काही ट्विट्स करत निर्मात्यांबद्दल बरेच खुलासे केले होते. सेटवरील व्यवस्थापन योग्य नसल्याचा खुलासा तिने या ट्विट्सद्वारे केला होता. त्याचप्रमाणे या प्रकरणी पुढाकार घेऊन समस्या सोडवल्याबद्दल तिने झी स्टुडिओजचे आभार मानले आहेत.

अमीषाने या चित्रपटातील एका सीनबद्दलही मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटाचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्यात तारा सिंग हा एका मृतदेहाजवळ बसून रडताना दिसून येतो. हा सीन पाहिल्यानंतर चाहत्यांनी असा अंदाज लावला की सीक्वेलमध्ये सकीना या व्यक्तिरेखेचा मृत्यू होतो. चित्रपटाच्या याच महत्त्वाच्या सीनबद्दल अमीषाने हा खुलासा केला आहे. नेटकऱ्यांनी जेव्हा असा अंदाज वर्तवला की चित्रपटात सकीनाचा मृत्यू होतो, तेव्हा अमीषाने ट्विटरवर त्या सीनचा फोटो शेअर केला. या सीनसोबतच तिने माहिती दिली की चित्रपटात सकीनाचा मृत्यू होत नाही. ‘गदर 2’ या चित्रपटातील हा खूप मोठा स्पॉइलर आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.