Gadar 2 OTT Release | ओटीटीवर कधी अन् कुठे प्रदर्शित होणार सनी देओलचा ‘गदर 2’; जाणून घ्या अपडेट

गदर 2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच उपलब्ध होणार आहे.

Gadar 2 OTT Release | ओटीटीवर कधी अन् कुठे प्रदर्शित होणार सनी देओलचा 'गदर 2'; जाणून घ्या अपडेट
गदर 2
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 5:31 PM

मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला असला तरी अद्याप बॉक्स ऑफिसवर त्याचा जलवा कायम आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यास सज्ज झाला आहे. ‘गदर 2’ या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. याविषयीची माहिती समोर आली आहे. ‘ओटीटी प्ले’नं दिलेल्या माहितीनुसार ‘गदर 2’ हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

गदर 2 लवकरच ओटीटीवर

या रिपोर्टनुसार, ‘गदर 2’चा ओटीटी प्रीमिअर येत्या 6 ऑक्टोबर रोजी झी 5 वर होणार आहे. एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या चार आठवड्यांनंतर तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जातो. मात्र ‘गदर 2’ हा चित्रपट चार आठवड्यांपेक्षा बराच काळ थिएटरमध्ये होता, म्हणून ओटीटीवर उशीरा प्रदर्शित केला जात आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आतापर्यंत या चित्रपटाने 517.28 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. यामध्ये सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘झी’कडे डिजिटल राइट्स

‘गदर 2’ या चित्रपटाचे डिजिटल आणि सॅटेलाइट राइट्स ‘झी’कडे आहेत. तेच या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. म्हणूनच हा चित्रपट ‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर याच प्लॅटफॉर्मवर ‘गदर : एक प्रेम कथा’ हा 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला पहिला भागसुद्धा 4K क्वालिटीमध्ये प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. गदर 2 हा चित्रपट जवळपास 80 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे.

हे सुद्धा वाचा

एकीकडे बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्याच ‘जवान’ची क्रेझ पहायला मिळत असतानाही ‘गदर 2’ अजूनही चांगली कमाई करतोय. शाहरुखच्या ‘पठाण’ने 524 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत तो अजूनही पहिल्या स्थानी आहे. तर ‘गदर 2’ दुसऱ्या स्थानी आहे. ‘पठाण’च्या कमाईचा विक्रम मोडण्यात अद्याप ‘गदर 2’ला यश मिळालं नाही.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.