Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar 2 मध्ये सनी देओलच्या सुनेची भूमिका साकारणार ‘ही’ सुंदर अभिनेत्री

गदर 2 ची कथासुद्धा मूळ रुपाने प्रेमाचीच आहे, मात्र यावेळी उत्कर्ष म्हणजेच चरणजीतचं प्रेम पाकिस्तानात आहे. मुलाच्या प्रेमाखातर तारा सिंगसुद्धा सीमापार पोहोचणार आहे.

Gadar 2 मध्ये सनी देओलच्या सुनेची भूमिका साकारणार 'ही' सुंदर अभिनेत्री
Sunny DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 11:45 AM

मुंबई : 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता होता. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला तुफान यश मिळालं होतं. आता बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही अनिल शर्मा यांनीच केलंय. विशेष म्हणजे जवळपास 20 वर्षांनंतर प्रदर्शित होणाऱ्या या सीक्वेलमधील बरेच कलाकार हे पहिल्या भागातील आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेल ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. या दोघांनी तारा सिंग आणि सकिनाची भूमिका साकारली होती. आता अभिनेता उत्कर्ष शर्मा हा तारा सिंगच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. तर सनी देओलच्या सूनेच्या भूमिकेवरूनही पडदा उचलण्यात आला आहे.

गदर 2 या चित्रपटात तारा सिंगच्या सूनेची भूमिका अभिनेत्री सिम्रत कौर साकारणार आहे. सिम्रत कौर ही पंजाबी कुटुंबातील आहे. तिचा जन्म 16 जुलै 1997 रोजी मुंबईत झाला. ती आतापर्यंत बऱ्याच पंजाबी म्युझिक अल्बममध्ये झळकली आहे. पंजाबी सुपरहिट गाणं ‘बुर्ज खलिफा’मध्येही ती दिसली.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Simrat Kaur (@simratkaur_16)

सिम्रतने 2017 मध्ये ‘प्रेमाथो’ या तेलुगू चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. आता बॉलिवूडमध्ये ती सनी देओलच्या गदर 2 या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या सीक्वेलमध्ये सिम्रतची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आपल्या मुलाच्या प्रेमाला भारतात आणण्यासाठी सनी देओल या सीक्वेलमध्ये पाकिस्तानात जाणार आहे. म्हणजेच चित्रपटाची मूळ कथा ही सिम्रतसाठीच्या लढ्याची असणार आहे.

सिम्रतचं पूर्ण नाव सिम्रत कौर रंधावा आहे आणि मुंबईतील डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तिने कम्प्युटर सायन्सची पदवी घेतली आहे. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने 7.9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

गदर 2 मध्ये सनी देओल पुन्हा एकदा अँग्री यंग मॅन तारा सिंगच्या अंदाजात आणि अमिषा पटेल सकिनाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात पाकिस्तानी जनरल कादिरची भूमिका साकारलेला अभिनेता मनीष वाधवा ‘गदर 2’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा फाळणीच्या 24 वर्षांनंतरची आहे. यामध्ये पाकिस्तानच्या लष्करसोबतची लढाईसुद्धा दाखवण्यात येणार आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.