‘गंगुबाई काठियावाडी’ फेम अभिनेत्यासोबत मोठी फसवणूक; ॲक्सिस बँक अकाऊंट हॅक

प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेता शांतनु माहेश्वरीसोबत फसवणूक झाली आहे. त्याचं बँक खातं हॅक झालं असून त्याच्या नावाने अचानक कार्ड जनरेट करण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला कोणताच ओटीपी आला नव्हता. याबद्दल त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

'गंगुबाई काठियावाडी' फेम अभिनेत्यासोबत मोठी फसवणूक; ॲक्सिस बँक अकाऊंट हॅक
Alia Bhatt and Shantanu MaheshwariImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 7:51 PM

मुंबई : 30 जानेवारी 2024 | प्रसिद्ध डान्सर आणि ‘गंगुबाई काठियावाडी’ फेम अभिनेता शांतनु माहेश्वरीसोबत मोठी फसवणूक झाली आहे. त्याच्या बँक खात्यातून अचानक कोणाला तरी कार्ड दिलं गेलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कार्ड जनरेट होण्यापूर्वी त्याला कोणत्याच प्रकारचा ओटीपी विचारण्यात आला नव्हता. याबद्दलची माहिती त्याने खुद्द सोशल मीडियावर दिली आहे. ॲक्सिस बँक खात्यातून अचानक कार्ड जनरेट झाल्याचं त्याने सांगितलं आहे. त्याच्या माहितीशिवाय ईमेल आयडी आणि फोन नंबर बदलण्यात आल्याचंही त्याने म्हटलंय.

शांतनू माहेश्वरीची पोस्ट-

‘धक्कादायक! माझ्या ॲक्सिस बँक अकाऊंटमध्ये फसणवूक झाली आहे. माझ्या कोणत्याही माहितीशिवाय कार्ड जनरेट करण्यात आलं आहे. त्याचा कोणताही ओटीपी मला आला नव्हता. इतकंच नव्हे तर कोणत्याही व्हेरिफिकेशनशिवाय माझा ई-मेल आयडी आणि फोन नंबर बदलण्यात आला आहे. माझ्या अकाऊंटची सुरक्षा परत करण्यासाठी त्वरित कारवाई करावी आणि यातून तातडीने मार्ग काढावा’, असं त्याने लिहिलं आहे. या पोस्टमध्ये त्याने मुंबई पोलीस, मुंबई सायबर पोलीस आणि ॲक्सिस बँकेला टॅग केलं आहे.

हे सुद्धा वाचा

शांतनुच्या या पोस्टवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘यात बँकवाल्यांचा समावेश आहे. त्याशिवाय हे शक्य नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘याआधीही असे स्कॅम झाले आहेत. बँकेकडून आणि पोलिसांकडून कारवाई व्हावी’, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. शांतनु हा प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेता आहे. त्याने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. तो लवकरच नीरज पांडे दिग्दर्शित ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तो अजय देवगण आणि तब्बू या जोडीसोबत काम करणार आहे.

शांतनुने ‘व्ही’ चॅनेलवरील ‘दिल दोस्ती डान्स’ या शोमधून टीव्हीवर पदार्पण केलं. 2017 त्याने ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 8’मध्ये सहभाग घेतला होता. शांतनुने या शोचं विजेतेपद पटकावलं होतं. उत्तम डान्सर असलेल्या शांतनुने ‘झलक दिखला जा 9’ आणि ‘नच बलिये 9’मध्येही भाग घेतला होता. या दोन्ही डान्स शोमध्ये तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. शांतनु हा ‘देसी हॉपर्स’ या डान्स ग्रुपचा सदस्य असून तो 2015 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये पार पडलेल्या ‘वर्ल्ड ऑफ डान्स’ चॅम्पियनशिपचा विजेता ठरला होता. ‘गंगुबाई काठियावाडी’ हा त्याचा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट ठरला आहे,

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.