Ravindra Mahajani | ‘आमचं नातं एकतर्फी होतं, गेल्या ३ वर्षांपासून..’, वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा

Ravindra Mahajani | रवींद्र महाजनी यांच्या निधनाचं मोठं कारण अखेर समोर; गश्मीर महाजनी याने वडिलांच्या निधनानंतर केला धक्कादायक खुलासा, सध्या सर्वत्र गश्मीर याच्या वक्तव्याची चर्चा

Ravindra Mahajani | 'आमचं नातं एकतर्फी होतं, गेल्या ३ वर्षांपासून..', वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा
रवींद्र महाजनी, गश्मीर महाजनी
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 8:21 AM

मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि सर्वत्र शोककळा पसरली. रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. रवींद्र महाजनी पुण्यात ऐकटेच राहत होते. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त होती. त्यांच्या निधनानंतर पुण्यात रवींद्र महाजनी एकटे का राहत होते, त्यांची काळजी कोणी का घेतली नाही… असे अनेक प्रश्न विचारत लोकांनी महाजनी कुटुंबावर निशाणा साधला.. यावर रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याने उत्तर दिलं आहे. आमचं नातं एकतर्फी होतं… असं वक्तव्य गश्मीर याने केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत गश्मीर महाजनी याने कुटुंबातील डार्क सिक्रेट सांगू शकत नाही असं म्हणत वडिलांच्या निधनाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘गेल्या २० वर्षांपासून ते आमच्यापासून वेगळे रहायचे. त्यांनी वेगळं राहणं पसंत केलं होतं. ज्यामुळे त्यांचा निर्णय स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता..’

पुढे गश्मीर म्हणाला, ‘तुम्ही कोणाला एखादी गोष्ट करण्यासाठी बळजबरी करु शकत नाहीत. आमचं नातं खरंतर एकतर्फी होतं. त्यांना आम्हाला भेटायची इच्छा असायची तेव्हा ते आम्हाला भेटायला यायचे आणि वाटेल तेव्हा निघून जायचे. माझा पहिला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ते अनेक दिवस होते आमच्यासोबत. ते खरंतर मूडी होते. त्यांना एकटं राहायला आवडायचं..’

‘त्यांची कळाजी घेण्यासाठी आम्ही अनेकदा केअरटेकर पाठवायचो, पण एक-दोन दिवसांत त्यांना कामावरून काढून टाकायचे. त्यांना स्वतःचं स्वतःला करायला आवडायचं.. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी आमच्यासोबत, कुटुंबियांसोबत, मित्र-परिवारासोबत मर्यादित संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती.’

‘अनेक कारणांमुळे आमचे संबंध ताणले गेले होते, पण ते माझे वडील होते, माझ्या आईचे पती होते. परंतु कुटुंबातील काही डार्क सिक्रेट सार्वजनिकरित्या उघड करणं योग्य नाही…’ असं देखील अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला.

रवींद्र महाजनी यांचे सिनेमे

मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. १९७५ ते १९९० या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. त्यांनी केलेले सिनेमेही चांगलेच गाजले. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम आहे. लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ आदी सिनेमे चांगलेच गाजले. तर बेलभंडार आणि अपराध मीच केला ही त्यांची नाटकेही गाजली.

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.