AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेचं मोठं स्वप्न पूर्ण; घेतली आलिशान कार, किंमत जाणून आश्चर्य वाटेल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची खास ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' अर्थातच गौरव मोरेचं एक मोठं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. त्याने एक आलिशान अन् महागडी कार विकत घेतली आहे. त्याने त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याची कारची किंमत जाणून तुम्हीही कराल कौतुक.

'फिल्टरपाड्याचा बच्चन' गौरव मोरेचं मोठं स्वप्न पूर्ण; घेतली आलिशान कार, किंमत जाणून आश्चर्य वाटेल
Gaurav More bought a luxurious Skoda Kushaq car Image Credit source: instagram
| Updated on: Apr 19, 2025 | 8:49 PM
Share

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून स्वत:ची ओळख घराघरात पोहोचवणारा अभिनेता, ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अर्थातच गौरव मोरेला आज कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. त्याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर लोकांमध्ये आपली क्रेझ प्रचंड निर्माण केली आहे. गौरवने त्याच्या मेहनतीच्या जोरावर फक्त मराठीतच नाही तर हिंदी इंडस्ट्रीमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. गौरवने शून्यातून आपलं झगमगत आणि यशाचं जग तयार केलं आहे. इथपर्यंत पोहोचायला त्याने घेतलेली मेहनत सर्वांनी पाहिली आहे.

गौरव मोरेचं मोठं स्वप्न पूर्ण

गौरवने अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं आहे. त्यातील त्याच एक स्वप्न आता पूर्ण झालं आहे. त्याचीच झलक त्याने त्याच्या सोशल मीडियावर दाखवली आहे. गौरवने त्याचं एक आलिशन कार घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. गौरव मोरेनं नवीकोरी महागडी अशी आलिशान कार विकत घेतली आहे. गौरवने स्क्वॉडा कार विकत घेतली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ही आनंदीची बातमी चाहत्यांना दिली आहे. नवी कार घेतल्यानंतर गौरव मोरे खूपच खुश आहे. गौरवने Skoda Kushaq कारचा व्हिडीओ शेअर करत “फायनली नवीन गाडी घेतली…”, असं कॅप्शनही त्याने दिलं आहे.

कारबद्दल माहिती

Skoda Kushaq ही SUV 1.0 लिटर TSI पेट्रोल इंजिनसह येते. जी 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. यामध्ये 385 लिटर बूट स्पेस, 50 लिटर फ्युएल टँक आणि 17 kmpl मायलेज आहे.​

कारची किंमत

Skoda Kushaq ची किंमत मॉडेलनुसार वेगवेगळी असते. पुण्यात या कारची ऑन-रोड किंमत 12.66 लाखांपासून सुरू होते. गौरव मोरे यांनी कोणते मॉडेल घेतले आहे हे अद्याप स्पष्ट नाही परंतु अंदाजे 12.5 लाख ते 20 लाखांदरम्यान ही कार असू शकते.​

गौरव मोरेला चाहत्यांकडून शुभेच्छा

गौरव मोरे यांनी त्यांच्या नवीन कारसोबतचा फोटो, व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या उंच भरारीबद्दल चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गौरव मोरेचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. गौरवने आपल्या अभिनय कौशल्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे जरी तो प्रसिद्धीस आला असला तरी त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. याशिवाय वेगवेगळे मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये धाटणीच्या भूमिका साकारुन गौरव मोरेने स्वत:ला सिद्ध केलं आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.