पती शाहरुख खान याच्या यशाचं गौरीला कौतुक; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…
बॉलिवूडचं परफेक्ट कपल शहरुख खान - गौरी खान यांच्या नात्यांची पुन्हा चर्चा; पतीच्या यशावर आनंद व्यक्त करत गौरीने पोस्ट केला खास फोटो..., सध्या सर्वत्र 'त्या' फोटोचीच चर्चा
Gauri Khan On Pathaan : अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने प्रदर्शनानंतर काही दिवसांत अनेक रेकॉर्ड ब्रेक केलं. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘पठाण’ सिनेमा आजही चाहत्यांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील सिनेमाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. गेल्या एक महिन्यापासून सर्वत्र किंग खान याच्या ‘पठाण’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ‘पठाण’ सिनेमानंतर अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर ‘शहजादा’ आणि अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘सेल्फी’ सिनेमा प्रदर्शित झाला. पण या शर्यतीमध्ये किंग खान याच्या ‘पठाण’ सिनेमाने बाजी मारली.
जगभरातील असंख्य चाहते किंग खान यांचं कौतुक करत असताना, शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिने देखील पतीसाठी आनंद व्यक्त केला आहे. गौरी खान हिने एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये ‘पठाण’ सिनेमाची जगभरातील कमाई दिसत आहे. पठाण सिनेमाने आतापर्यंत जगभरात तब्बल १०२६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.
गौरी खान हिने खास फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘रेकॉर्ड ब्रेक…’ असं लिहिलं आहे. सध्या गौरी खान हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गौरीच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या सर्वत्र गौरीच्या पोस्टची चर्चा रंगलेली आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, ‘पठाण’ सिनेमातून शाहरुख खान याने तब्बल ४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा पदार्पण केल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते सिनेमागृहात एकच गर्दी करत आहेत. सिनेमाने जगभरात तब्बल १०२६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला असून भारतात ५२८.८९ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.
‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी आणि प्रदर्शित झाल्यानंतर देखील सिनेमाच्या टीमने ‘पठाण’चं प्रमोशम केलं नाही. फक्त किंग खान सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात होता. आस्क एसआरके सेशनच्या माध्यामातून अभिनेत्याने चाहत्यांच्या प्रश्नाचं उत्तर विनोदी अंदाजात दिलं.
सिनेमा प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला. पण कोणत्याही वादाचा परिणाम बॉक्स ऑफिसवर झाला नाही. ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशर्म रंग’ गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद टोकाला पोहोचला होता. पण तरी देखील सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात चाहत्यांनी गर्दी केली.