गौतमी पाटील नवऱ्याला सोडेल, पण आयुष्यातील ‘या’ खास व्यक्तीला कधीच सोडणार नाही

गौतमी पाटील हिच्या आयुष्यातील 'ती' खास व्यक्ती, त्या व्यक्तीसाठी गौतमी पतीला देखील सोडयला तयार, पाहा काय म्हणाली नृत्यांगना? सध्या सर्वत्र गौतमीच्या व्हिडीओची चर्चा

गौतमी पाटील नवऱ्याला सोडेल, पण आयुष्यातील 'या' खास व्यक्तीला कधीच सोडणार नाही
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 1:20 PM

मुंबई : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील  (Gautami Patil) हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण गौतमीच्या चाहत्यांची संख्या जेवढी मोठी आहे, तेवढीच मोठी संख्या तिचा विरोध करणाऱ्यांची देखील आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे गौतमीला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. रिलस्टार म्हणून प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद एक समीकरण बनले आहे. अनेक गोष्टींमुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. पण गौतमी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वी गौतमीने जोडीदाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आयुष्यात पती कसा हवा याबद्दल गौतमीने मोठं वक्तव्य केलं होतं. जोडीदाराबद्दल गौतमी म्हणाली, ‘मला प्रसिद्धी, प्रतिष्ठा, बंगला, पैसा… काहीही नकोय. माझ्या आयुष्यात जी परिस्थिती येईल, त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे…’ असं गौतमी म्हणाली.

हे सुद्धा वाचा

आता गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गौतमी तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल बोलताना दिसत आहे. गौतमी म्हणाली, ‘आता जेवढं चालू होतं ते तिच्यासाठीच चालू होतं. असं वाटतं मी लग्न करून जाईल तेव्हा तिचं कसं होईल. तिच्याकडे कोण बघेल. तिला कोण सांभाळणार. तिला मी कधी एकटं सोडणार नाही. नवऱ्याला सोडेल… विषय होता आई…’

व्हिडीओमध्ये गौतमी तिच्या आईबद्दल बोलताना दिसत आहे. सध्या गौतमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गौतमी आईसाठी पतीला देखील सोडायला तयार आहे… असं व्हिडीओमध्ये नृत्यांगना बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ official_gautemi941 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

गौतमीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण नृत्याच्या जोरावर गौतमी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. गौतमीचा पहिला मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. गौतमीच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘घुंगरु’ असं आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. (Gautami Patil Dance)

गौतमी पाटील सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमलेली असते. आता गौतमी मोठ्या पडद्यावर देखील झळकणार आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.