Gayatri Joshi | 4 कोटींच्या या कारने वाचवला गायत्री जोशीचा जीव; जाणून घ्या गाडीचे खास फिचर्स
दोन ते तीन गाड्यांची एकमेकांना जोरदार टक्कर झाल्यानंतर फरारीला आग लागली. त्यामुळे फरारीत बसलेल्या 63 वर्षीय मेलिसा क्रॉटली आणि 67 वर्षीय मार्क्स क्रॉटली यांचा मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात गायत्री आणि तिच्या पतीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : इटलीतील सार्डिनिया इथं पार पडलेली सुपरकार टूर प्राणघातक ठरली. या अपघातात दोन ते तीन महागड्या गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि त्यात दोन लोकांनी आपले प्राण गमावले. ज्या दोन-तीन गाड्यांची आपापसांत टक्कर झाली त्यात शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री गायत्री जोशी आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांच्याही लँबोर्गिनीचा समावेश होता. बुधवारी या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दोन ते तीन गाड्या एका कॅम्परवॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला आणि फरारी गाडीला आग लागली. या आगीमुळे फरारीतील स्विस दाम्पत्याचा मृत्यू झाला.
या भीषण अपघातात गायत्री आणि तिच्या पतीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्यांच्या महागड्या कारनेच त्यांचा जीव वाचवल्याचं म्हटलं जात आहे. लँबोर्गिनी हुरेकन स्पायडर (Lamborghini Huracan Spyder) असं त्यांच्या कारचं नाव आहे. नवी दिल्लीत या गाडीची किंमत तब्बल चार कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये 5204 सीसीचं इंजिन असून ते 7-स्पीड लँबोर्गिनी डोपिया फ्रीजियोन (LDF) ड्युएल क्लच ट्रान्समिशनशी जोडलेला आहे. हे सेटअप 8000rpm वर 630.3bhp आणि 6500rpm वर 600Nm आउटपुट देतं.
पहा व्हिडीओ
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023
लँबोर्गिनी हुरेकन स्पायडरची टॉप स्पीड
या कारची टॉप स्पीड 325 km/h इतकी असून ते शून्यापासून 100kmph ची स्पीड लेव्हल अवघ्या 3.1 सेकंदात मिळवतं. या कारच्या पुढे 20 इंचांचा आणि रियरमध्ये 19 इंचांचा व्हील आहे. त्याची लांबी 4,520mm, रुंदी (मिरर्सशिवाय) 1,933mm, रुंदी (मिरर्ससोबत) 2,236mm आणि उंची – 1,180mm इतकी आहे. या सुपरकारचा व्हीलबेस- 2,620mm इतका आहे.
कारचे फीचर्स
या टू-सीटर सुपरकारच्या फीचर्समध्ये मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल एक्सटीरिअर रियर व्ह्यू मिरर, टच स्क्रीन, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, अलॉय व्हील, फॉग लाइट्स- फ्रंट अँड रियर आणि पॉवर विंडो यांचा समावेश आहे. याशिवायही कारमध्ये इतर बरेच फीचर्स देण्यात आले आहेत.