Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांनी विमानतळावरच केली अटक; धक्कादायक गोष्ट समोर

प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांनी विनामतळावरच केली अटक, धक्कादायक गोष्ट समोर आल्यामुळे अभिनेत्रीला मोजावी लागली मोठी किंमत... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

प्रसिद्ध अभिनेत्रीला पोलिसांनी विमानतळावरच केली अटक; धक्कादायक गोष्ट समोर
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 11:10 AM

मुंबई | 19 जुलै 2023 : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेलबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. पोलिसांनी अभिनेत्रीला विमानतळावरच अटक केल्यामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सुपरमॉडेल गिगी हदीद आहे. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे, तिची मैत्रिण लिआह निकोल मॅककार्थी हिला देखील पोलिसांनी ताब्यत घेतलं आहे. सुपरमॉडेल आणि तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. ड्रग्ज बाळगल्याचा आरोप होता.

गिगी हदीद आणि मैत्रिण लिआह निकोल मॅककार्थी एकत्र प्रवास करत होत्या. तेव्हा त्यांच्या बॅगेत ड्रग्स असल्याचं कळलं. तेव्हा पोलिसांनी दोघींना अटक केली. १२ जुलै २०२३ रोजी, गिगी हदीद आणि लिआह निकोल मॅककार्थी न्यायालयात हजर झाल्या होत्या. आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. पण यासाठी अभिनेत्रीला मोठी किंमत मोजवी लागली आहे. दोघींना एक हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे.

गिगी हदीद आणि तिची मैत्रिण लिआ मॅक्कार्थी पाम हाइट्समध्ये थांबले होते. अभिनेत्रीने दोघींचे फोटो सोशल मीडियावर देखील पोस्ट केले होते. याचदरम्यान गिगीहिच्या एका प्रवक्त्याने मोठी माहिती दिली, ‘गिगी वैद्यकीय परवाना घेऊन एनवाईसीमध्ये कायदेशीररित्या खरेदी केलेला गांजा घेऊन प्रवास करत’, ग्रँड केमनमध्ये २०१७ पासून वैद्यकीय वापरासाठी देखील ते कायदेशीर आहे.’ सध्या सर्वत्र गिगी हदीद हिची चर्चा तुफान रंगत आहे.

गिगी हदीद कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. गिगी आता अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियो याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. लियोनार्डो याच्यासोबत नावाची चर्चा होत असल्यामुळे गिगी हिचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलं आहे.

गिगी हदीद हिच्यासोबत नाव जोडण्यापूर्वी लिओनार्डो आणि कॅमिला मोरोन हिला डेट करत होता. चार वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता लियोनार्डो आणि गिगी यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर दोघांना अनेक ठिकाणा स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....