Sridevi | गूगलने अनोख्या अंदाजात श्रीदेवी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; खास डूडल सादर
श्रीदेवी यांच्या वाढदिवसानिमित्त गूगलकडून शुभेच्छा, खास डूडल तयार करत आठवणी केल्या ताज्या... इंटरनेटवर सर्वत्र फक्त आणि फक्त श्रीदेवी यांची चर्चा...
मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : आतापर्यंत गूगलने आपले डूडल बनवून अनेक प्रसंग खास बनवले आहेत. गुगलने आजही असंच केलं आहे. गूगलने आतापर्यंत अनेक दिग्गजांचं डूडल बनवून त्यांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. आज गूगलने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं डूडल तयार केलं आहे. श्रीदेवी यांचा वाढदिवस असल्यामुळे गूगलने खास डूडल तयार केलं आहे. सध्या सर्व सर्च इंजिनवर असलेल्या डूडलची चर्चा रंगत आहे. श्रीदेवी यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. १३ ऑगस्ट १९६३ मध्ये श्रीदेवी यांचा जन्म झाला. पण अभिनेत्रीच्या निधनाने कुटुंबियांसह चाहत्यांना देखील मोठा थक्का बसला. आज गूगलने डूडलच्या माध्यमातून श्रीदेवी यांच्या आठवणी ताज्या केल्यामुळे चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.
श्रीदेवी यांनी असंख्य सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. श्रीदेवी यांचं अभिनय पाहून चाहत्यांनी देखील त्यांना डोक्यावर घेतलं. श्रीदेवी फक्त त्यांच्या अभिनयामुळेच नाही तर, नृत्य कौशल्यामुळे देखील कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असायच्या. एवढंच नाही तर, त्यांचे सिनेमे आणि गाणी चाहते तितक्याच प्रेमाने पाहतात आणि ऐकतात.
श्रीदेवी यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या काही चाहत्यांना माहिती आहेत, तर काहींना नाही. श्रीदेवी यांचं खरं नाव श्री अम्मा यांगार अय्यपन होतं हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी सिनेसृष्टीतील पदार्पण करण्यापूर्वी स्वतःचं नाव बदललं. श्रीदेवी यांनी बॉलिवूडपासून दक्षिणेतील तमिळ, तेलगू, मल्याळम भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. आज श्रीदेवी यांचा ६० वा वाढदिवस असल्याने आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त गूगल डूडलने अनोख्या अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या खास निमित्त गूगलच्या सर्च इंजिनवर श्रीदेवीचा फोटो बनवण्यात आला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री डान्स करताना दिसत आहेत. यासोबतच त्याच्या आजूबाजूला सिनेमाची झलक पाहायला मिळते. यासोबतच त्याच्या नागिन या सुपरहिट सिनेमातील खास पोज देखील पाहायला मिळत आहेत. सध्या सर्वत्र श्रीदेवी यांची चर्चा रंगत आहे.
श्रीदेवी यांच्याबद्दल सांगायचं झालं, पुरुष प्रधान फिल्म इंडस्ट्रीमध्ये श्रीदेवी एकमेव महिला सुपरस्टार होत्या. ८० – ९० च्या दशकात श्रीदेवी यांचं बॉलिवूडवर वर्चस्व होतं. आज त्या जिवंत नसल्या तरी अनेक महिलांच्या प्रेरणा स्थानी श्रीदेवी आहेतय २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला.
श्रीदेवी यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. श्रीदेवी यांचं निधन दुबई याठिकाणी झाल्यामुळे त्यांच्या मृतदेह भारतात आणण्यासाठी बराच काळ लागला. दुबईमध्ये कौटुंबिक लग्नादरम्यान अभिनेत्रीचा हृदयविकाराच्या झटका आला आणि बाथ टथमध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अभिनेत्रीच्या मृत्यूने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.