Shubman Gill | क्रिकेटर शुभमन गिल याची पत्नी कोण? गूगलच्या उत्तराने बसेल धक्का
शुभमन गिल याच्या आयुष्यातील खास व्यक्ती कोण, गूगल सांगतोय कोण आहे क्रिकेटरची पत्नी, सारा अली खान की सारा तेंडुलकर? गूगलच्या उत्तराने बसेल धक्का
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटर शुभमन गिल (Shubman Gill) याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. शुभमन याचं नाव अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. पण काही दिवसांपूर्वी सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांनी सोशल मीडियावरुन एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला. सारा अली खान हिच्यासोबत ब्रेकअपच्या चर्चा रंगल्यानंतर शुभमन याचं नाव सारा तेंडुलकर याच्यासोबत जोडण्यात आलं. सध्या सर्वत्र सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.
सध्या सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्याबद्दल आणखी एक माहितीसमोर येत आहे. इंटरनेट सर्च इंजिन गूगल साराला युवा क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी म्हणून दाखवत आहे. फोटो पाहिल्या सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या चाहत्यांना थक्क करणारी माहिती समोर येत आहे. गूगलच्या उत्तराने सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
सध्या सर्वत्र सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा आहे. पण दोघांना यावर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, २०२० पासून त्यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. पण १४ फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या नात्याला दुजोरा देण्यात आला. पण सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप मौन बाळगलं आहे..
दरम्यान, शुभमन गिल याचं नाव अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण आता दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.. सारा अली खान हिच्यासोबत ब्रेकअप चर्चांनी जोर धरला आहे, तर दुसरीकडे शुभमनचं नाव सारा तेंडुलकर हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. त्यामुळे नक्की सत्य काय हे अद्याप समोर आलेलं नाही.
एका मुलाखतीत साराला डेट करत आहेस का? असा प्रश्न देखील क्रिकेटरला विचारण्यात आला. या प्रश्नावर शुभमन म्हणाला, ‘शायद हा शायद ना…’ या उत्तरानंतर शुभमन तुफान चर्चेत आला. शिवाय सारा देखील शुभमन यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. पण साराने यावर मौन बाळगलं आहे. आता दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.